एक्स्प्लोर

T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या दिल्लीतील भेटीबाबतची माहिती समोर आली आहे. 

Team India Squad for 2024 T20 World Cup: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 मध्ये शनिवारी सामना झाला. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात दिल्लीतील भेटीबाबतची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनूसार, काल मुंबई आणि दिल्लीचा सामना अरुण जेटली मैदानावर झाला. रोहित शर्मा देखील मुंबई संघाचा भाग असल्याने तो दिल्लीत होता. यावेळी अजित आगरकर देखील दिल्लीत दाखल झाले. त्यामुळे आयसीसी टी-20 विश्वचषक 2024च्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट होऊन संघनिवडीबाबत (Team India For T20 WC) अनौपचारिक बैठक होण्याची शक्यता आहे. 

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अजित आगरकर कर्णधार रोहित शर्मासोबत टी 20 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची नावं अंतिम करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. यामुळे अजित आगरकर यांना कर्णधार रोहितशी बोलण्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत भेटून अंतिम संघ निवडण्याची संधी मिळेल. काही खेळाडूंच्या निवडीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे याबाबत अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यात चर्चा होईल. 

हार्दिकची निवड झाल्यास....

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला 15 सदस्यीय संघात स्थान मिळाले तर शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांच्यापैकी एकालाच स्थान दिले जाऊ शकते. यष्टिरक्षकाच्या पर्यायासाठी ऋषभ पंतसह संजू सॅमसन आणि केएल राहुल यांच्या नावावर चर्चा होणार आहे. जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्मात आहे, तर अनुभवी मोहम्मद सिराजची आयपीएलमध्ये कामगिरी चांगली राहिलेली नाही. अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहल यांच्यात संघाच्या तिसऱ्या फिरकीपटूसाठी स्पर्धा होणार आहे. उत्तम फलंदाजी कौशल्यामुळे अक्षरचा दावा अधिक भक्कम आहे. रवींद्र जडेजाही 15 सदस्यीय संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे.

1 जूनपासून स्पर्धेला होणार सुरुवात-

सध्या आयपीएल 2024 चा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलमध्ये भारतासह अनेक विदेशी खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. आयपीएलचा हंगाम संपताच आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ( T20 WC 2024) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. 1 जूनला अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. 

गटवारी 

अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

भारतीय संघाचे वेळापत्रक

5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 

संबंधित बातम्या:

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?

Shashank Singh: पंजाबने संधी दिल्यापासून धू धू धुतोय...; प्रतिस्पर्धी संघांना जोरदार नडतोय, कोण आहे शशांक सिंह?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget