(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2024 Ind vs SA Final: '...तर रोहित शर्मा बार्बाडोसच्या समुद्रात उडी मारेल'; फायनलपूर्वी सौरव गांगुलीच्या विधानाची रंगली चर्चा
T20 World Cup 2024 Ind vs SA Final: जेतेपदाची लढत सुरू होण्याआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडिया यंदा जेतेपदाची ट्रॉफी उचलेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
T20 World Cup 2024 Ind vs SA Final: भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषक (T20 World Cup 2024) पटकावण्याच्या मार्गावर आहे. बार्बाडोस येथे खेळल्या जाणाऱ्या 2024 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. काही महिन्यांपूर्वी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 6 विकेट्ने पराभव पत्करावा लागल्याने निराशेचा सामना करावा लागला होता. आता टीम इंडिया पुन्हा फायनलमध्ये पोहोचली आहे, मात्र जेतेपदाची लढत सुरू होण्याआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडिया यंदा जेतेपदाची ट्रॉफी उचलेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सौरव गांगुली म्हणाला, मला वाटत नाही की रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली 6-7 महिन्यांत दुसऱ्या विश्वचषकाच्या अंतिम पराभवाचा सामना करू शकेल. सात महिन्यांत त्याच्या नेतृत्वाखाली दोन फायनल हरल्यास तो कदाचित बार्बाडोस महासागरात उडी घेईल, असंही सौरव गांगुली गंमतीत म्हणाला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये चांगली खेळी करुन संघाचे नेतृत्व करण्याचे चांगले काम केलं, असं म्हणत गांगुलीने रोहित शर्माचे कौतुक केले.
टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा-
रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली आहे, संघाचे नेतृत्व चांगले केले आहे. मला आशा आहे की ही कामगिरी उद्याही कायम राहील. टीम इंडिया निर्भय क्रिकेट खेळून ट्रॉफी उंचावेल अशी अपेक्षा आहे. भारत यात सर्वोत्तम संघ ठरला आहे. मला आशा आहे की नशीब उद्या भारताला साथ देईल, कारण त्यात नशिबाची मोठी भूमिका असते, असं गांगुली म्हणाला.
सौरव गांगुली नेमकं काय म्हणाला?, पाहा Video
#WATCH | On India vs South Africa T20 World Cup final, former Team India captain, Sourav Ganguly says, "...To get to two World Cup finals in 7 months speaks volumes about the capability & strength of the team...They will not make any changes to the team and this is Rohit Sharma's… pic.twitter.com/w4WBufjxqM
— ANI (@ANI) June 28, 2024
राखीव दिवशीही पाऊस पडला तर...
आयसीसीच्या नियमानुसार अंतिम सामना न झाल्यास किंवा टाय झाल्यास सुपर ओव्हर घेण्यात येते. राखीव दिवशीही कोणताही संघ विजेता होऊ शकला नाही आणि सुपर ओव्हर देखील शक्य नसेल तर अंतिम सामन्याचा निकाल 'अर्निणित' म्हणून घोषित केला जाईल. सुपर ओव्हर न झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. मात्र टी-20 विश्वचषकाच्या 17 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही संयुक्त विजेता झालेला नाही.
संबंधित बातम्या:
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस!