T20 World Cup 2024 Ind vs SA Final: द. अफ्रिकेविरुद्ध टी-20 विश्वचषक जिंकण्याची संधी; 3 फॅक्टर टीम इंडियाला मिळवून देईल जेतेपद!
T20 World Cup 2024 Ind vs SA Final: आज दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून भारताला जेतेपदावर आपलं नाव कोरण्याची संधी आहे.
T20 World Cup 2024 Ind vs SA Final: भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषक (T20 World Cup 2024) पटकावण्याच्या मार्गावर आहे. बार्बाडोस येथे खेळल्या जाणाऱ्या 2024 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. काही महिन्यांपूर्वी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 6 विकेट्ने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आज दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून भारताला जेतेपदावर आपलं नाव कोरण्याची संधी आहे.
The big day is here! 🙌#TeamIndia have arrived in Barbados for the summit clash! ✈️#T20WorldCup | #SAvIND | #Final pic.twitter.com/0WAzyk3jWV
— BCCI (@BCCI) June 29, 2024
भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. भारताने 2007 पाकिस्तानला पराभूत साली टी-20 विश्वचषक जिंकला होता. तर 2014 साली अंतिम सामन्यात भारतीय संघ दाखल झाला होता. यावेळी बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय संघाचा तीन फॅक्टर विजय निश्चित होण्याती शक्यता आहे.
विजयाचे तीन फॅक्टर-
भारताची फलंदाजी खूप चांगली आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे रोहित शर्माने गेल्या दोन सामन्यात आक्रमक आणि उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. रोहितसोबत सूर्यकुमार यादवने देखील चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आजही रोहित आणि सूर्याला धावा काढाव्या लागतील. फलंदाजीसोबत भारतीय संघाची गोलंदाजी देखील मजबूत आहे. यंदाच्या विश्वचषकात गोलंदाजांच्या कामगिरीवर भारताने सामने जिंकले आहेत. भारताची गोलंदाजी विजयाचा दुसरा फॅक्टर आहे. तर क्षेत्ररक्षणातही भारतीय संघ खूप पुढे आहे. याचाच फायदा आज भारतीय संघाला होईल, क्षेत्ररक्षण देखील विजयाचा तिसरा फॅक्टर असेल.
दोन्ही संघांचा आतापर्यंतचा प्रवास-
भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा पराभव केला. आता अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. आयर्लंडसह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तान, अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत केले आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.
संबंधित बातम्या:
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस!