एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Ind vs Pak: रोहित शर्माचा मोहम्मद आमिरसमोर खराब रेकॉर्ड; विराट कोहलीचं काय?, धक्कादायक आकडेवारी समोर

T20 World Cup 2024 Ind vs Pak: T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात काही खेळाडूंकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असेल.

T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) 19 वा सामना  भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात होणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. या सामन्यात विराट कोहलीची (Virat Kohli) फटकेबाजी पाहायला मिळेल. 

T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात काही खेळाडूंकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असेल. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद यांचा समावेश आहे. मात्र, अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद आमिर चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नाही. परंतु आमिरने यापूर्वी अनेकदा विराट कोहली आणि रोहित शर्माला अडचणीत आणले आहे. 

रोहित शर्माविरुद्ध मोहम्मद आमिरचा विक्रम-

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आमिरविरुद्ध रोहित शर्माची आकडेवारी चांगली नाही. आमिरने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत भारतीय कर्णधाराला 7 चेंडू टाकले आहेत, ज्यामध्ये त्याने फक्त 1 धावा काढल्या आहेत आणि 2 वेळा त्याने विकेट गमावली आहे. आमिरच्या 7 पैकी 6 चेंडूत रोहित शर्माला एकही धाव करता आली नाही.

विराट कोहलीविरुद्ध मोहम्मद आमिरचा विक्रम-

मोहम्मद आमिरने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीला 19 चेंडू टाकले आहेत. आमिरने विराट कोहलीला टी-20 क्रिकेटमध्ये एकदाही बाद केलेले नाही. कोहलीने आमिरविरुद्ध 19 चेंडूत 84.2 च्या स्ट्राईक रेटने 16 धावा केल्या आहेत.

आज कोणाला मिळणार संधी?

पाकिस्तानला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करायला लागला होता. तर भारताने आयर्लंडविरुद्ध विजयी सुरुवात केली आहे. भारताविरुद्धचा सामन्यात विजय मिळवणं पाकिस्तानसाठी महत्वाचं असणार आहे. भारताकडून आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने सलामीवीरची भूमिका बजावली होती. त्यामुळे आज पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला येणार की यशस्वी जैस्वाल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच आयर्लंविरुद्ध संजू सॅमसनला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आज अक्षर पटेलच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 Ind vs Pak: शाहीन अफ्रिदीने जसप्रीत बुमराहच्या मुलाला दिलं होतं गिफ्ट; संजना म्हणाली, अंगद ते आजही वापरतोय...

T20 World Cup Ind vs Pak: महामुकाबला! टी-20 विश्वचषकात आज भारत अन् पाकिस्तान यांच्यात लढत; सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget