IND vs ZIM Head To Head, Pitch Report, Live Streaming: भारत आणि झिम्बाब्वे (IND VS ZIM) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात येणार आहे. आजपासून या मालिकेला सुरुवात होणार असून भारतीय वेळेनूसार सायंकाळी 4.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल, तर झिम्बाब्वे संघाच नेतृत्व सिकंदर राजा करणार आहे. टी-20 च्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. टी-20 विश्वचषक पटकवल्यानंतर प्रथमच भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यास उतरणार आहे. 


झिम्बाब्वेने टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाला कडवी झुंज दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. झिम्बाब्वेने गेल्या 5 टी-20 सामन्यांमध्ये भारताला कडवी टक्कर दिली आहे. झिम्बाब्वेने भारताला दोनदा पराभूत केले आहे, तर भारतीय संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी, आत्तापर्यंत भारत आणि झिम्बाब्वे 8 वेळा टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर झिम्बाब्वेने भारताला दोनदा पराभूत केले आहे.


भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 फॉरमॅटमध्ये हेड टू हेड... 


भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे येथे एकूण 8 टी-20 सामने झाले आहेत. 2010 मध्ये या मैदानावर भारत पहिल्यांदा T-20 खेळला असेल. हरारे स्पोर्ट्स क्लब सॅलिसबरी स्पोर्ट्स क्लब म्हणून ओळखला जातो. या मैदानावर आतापर्यंत ४१ टी-२० सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 23 वेळा विजय मिळवला असून उपविजेता संघाने 17 वेळा यश मिळवले आहे. मैदानावर प्रथम फलंदाजी केलेल्या धावांची सरासरी संख्या 156 धावा आहे. दुसऱ्या डावात धावांची सरासरी संख्या 139 धावपटूंची आहे.


हरारेमध्ये हवामानाचा अंदाज काय?


भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान हरारे येथील तापमान 11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वे, उत्तर गोलार्धात स्थित असल्याने, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये थंड हवामान अनुभवते. त्याचवेळी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की पावसाची शक्यता नाही.


लाइव्ह स्ट्रीमिंग कधी, कुठे आणि कसे बघाल?


भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सामना सुरू होईल. भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिका पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही थेट स्ट्रीमिंगवर सोनी लाइव्हवर पाहता येईल.


संबंधित बातम्या:


गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video


हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?


IPL 2025 Mega Auction: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव कधी अन् कुठे होणार?; नवीन अपडेट समोर, पाहा A टू Z माहिती