Indian Cricket Team Updates: टी-20 विश्वचषक 2024 ची (T20 World Cup 2024) स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसहून भारतात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती. त्यामुळे एअर इंडियाच्या AIC24WC या विशेष विमानाने भारतात परत आणण्यात आले. आज टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला रवाना होईल. मुंबईत संध्याकाळी 5 च्या सुमारास विश्वविजेत्यांचा शानदार रोड शो होईल.
विराट कोहलीने विमानतळाबाहेर येताच काय केलं?
विमान दिल्लीत दाखल झाल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू हळूहळू बाहेर येत होते. सर्व खेळाडूंना हॉटेलला नेण्यासाठी विमानतळाबाहेर बस उभी होती. यावेळी विराट कोहली (Virat Kohli) बसमध्ये बसण्यासाठी येताच उभस्थित असणाऱ्या चाहत्यांनी मोठ्याने कोहली-कोहली, अशा घोषणा दिल्या. यावेळी विराट कोहलीने देखील चाहत्यांना हात दाखवत आभार मानले.
वानखेडे स्टेडियमवर होणार सन्मान-
भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने २०११ सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर गुरुवारी भारताच्या टी-२० विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.
टीम इंडियाचे आजचे वेळापत्रक-
सकाळी 6 वाजता: नवी दिल्लीत आगमन
सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत भेट.
दुपारी 2 वाजता : मुंबईकडे रवाना.
सायंकाळी 5 वाजता : मरिन ड्राइव्हला आगमन,
सायंकाळी 5 वाजता : वानखेडे स्टेडियमच्या दिशेने बस परेड. सायंकाळी ७ वाजल्यापासून: वानखेडे स्टेडियमवर विजयी सोहळा
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा विजय-
भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 169 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?
रोहित-विराटपासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत; 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर कोणी-कोणी निवृत्ती घेतली?