Suryakumar Yadav Ind Vs Pak Final Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्याआधी सूर्या बॅक-टू-बॅक फ्लॉप, भारतीय संघाची डोकेदुखी वाढली
Ind Vs Pak Final Asia Cup : आशिया कप 2025 मध्ये भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची कामगिरी अपेक्षेपेक्षा निराशाजनक ठरली आहे.

Suryakumar Yadav Ind Vs Pak Final Asia Cup : आशिया कप 2025 मध्ये भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची कामगिरी अपेक्षेपेक्षा निराशाजनक ठरली आहे. कर्णधारपदाचा परिणाम त्यांच्या फलंदाजीवर होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार फक्त 12 धावा करून बाद झाले. सुपर-4 मधील अखेरचा सामना भारत-श्रीलंका यांच्यात रंगला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले. अभिषेक शर्माने झंझावाती अर्धशतक झळकावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी निराशा केली.
पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्याआधी सूर्या बॅक-टू-बॅक फ्लॉप (Suryakumar Yadav Failed Again In Asia Cup)
विशेषतः म्हणजे सूर्यकुमार यादव बॅक-टू-बॅक सामन्यात फ्लॉप ठरला आहे. 2025 च्या आशिया कपमध्ये आतापर्यंत त्याने पाच डावांमध्ये फक्त 71 धावा केल्या आहेत. त्याने युएईविरुद्ध 7, पाकिस्तानविरुद्ध 47 आणि ओमानविरुद्ध फलंदाजी केली नाही. पाकिस्तानविरुद्ध सुपर फोरमध्ये तो शून्यावर बाद झाला. बांगलादेशविरुद्ध 5 धावा केल्या आणि श्रीलंकेविरुद्ध 12 धावा करून बाद झाला. आकडेवारीनुसार, कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या शेवटच्या 10 टी-20 डावांमध्ये फक्त 99 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 12.37 आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट फक्त 110 आहे.
🚨🚨 SURYAKUMAR YADAV FAILED ONCE AGAIN!!
— Rajiv (@Rajiv1841) September 26, 2025
- Sky scored 12 runs off 13 bows tonight, he has been a very huge dissapointment as a batter ever since his appointment as captain.
- A leadership material like Shreyas Iyer is sitting out. I don't know how long a rope Sky gonna get!! pic.twitter.com/kPVw3yzgn5
भारतीय संघाची डोकेदुखी वाढली
अंतिम सामना जवळ येत असताना, सूर्यकुमार यादवचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. टॉप ऑर्डरमधले गडी लवकर बाद झाले, तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यावर मोठी जबाबदारी येते. पण तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला, तर मधल्या फळीवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
अभिषेक शर्माची तुफानी फटकेबाजी
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. सुरुवात फारशी चांगली झाली नाही, मात्र त्यानंतर अभिषेक शर्माने तुफानी फटकेबाजी केली. अभिषेकने केवळ 31 चेंडूत 61 धावा केल्या. त्याला तिलक वर्माने (नाबाद 49) आणि संजू सॅमसनने (39) चांगली साथ दिली. या त्रिकुटाच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावांचा डोंगर उभारला.
हे ही वाचा -





















