(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra: रौप्यपदक विजेता नीरज चोप्राचं अँडरसन पीटर्स आणि जाकुब व्हॅदलेचलाठी खास ट्वीट
World Athletics Championships 2022: भारतीय भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला.
World Athletics Championships 2022: भारतीय भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या पदकासह नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली. याआधी वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 2003 मध्ये महिला ऍथलेटिक्स अंजू बॉबी जॉर्जनं भारताला कांस्यपदक दिलं होतं. पण या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणारा पहिला भारतीय पुरुष होण्याचा मान नीरज फटकावला. चौथ्या प्रयत्नांत 88.13 मीटर लांब भालाफेक करून रौप्यपदकावर नाव कोरलं. यानंतर नीरज चोप्रानं त्याचे प्रतिस्पर्धकांना ट्विटरवर शेअर केलाय.
नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 90.54 मीटर (सर्वोत्तम) अशी कामगिरी नोंदवली. नीरजसह कोणत्याही खेळाडूला त्याच्या तीन सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचता आलं नाही. चेक प्रजासत्ताकच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जॅकूब व्हॅडलेचनं 88. 09 मीटर अंतरासह कांस्यपदक पटकावलंय.
नीरज चोप्राचं ट्वीट-
नीरज चोप्रा काय म्हणाला?
“परिस्थितीशी थोडासा संघर्ष केला, पण वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारतासाठी पदक जिंकल्याचा खूप आनंद झालाय. अँडरसन पीटर्स आणि जेकब वडलेच यांचं अभिनंदन. घरातून आणि मैदानावर येऊन पाठिंबा देणाऱ्यांचे आभार!"
नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप रौप्यपदक जिंकल्यानंतर देशभरातून त्याच्या कामगिरीचं कौतुकाचा वर्षाव केला होता. हरयाणामधील पानिपतजवळील खांदरा गावचा रहिवासी असणाऱ्या नीरजच्या ऐतिहासिक यशाबद्दल हरयाणाचं मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांनी अभिनंदन केलंय.
हे देखील वाचा-
- IND vs WI: टीम इंडियाच्या आनंदावर पाणी फेरणारं वृत्त, आयसीसीनं ठोठावला सर्व खेळाडूंना दंड! कारण काय?
- Axar Patel breaks MS Dhoni Record: वेस्ट इंडीजविरुद्ध अक्षर पटेलची बॅट तळपली, धोनीचा 17 वर्ष जुना विक्रम मोडला!
- WI vs IND: त्यांच्याच मायभूमीवर त्यांनाचं नमवलं! वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर 'गब्बर'ची खास क्लबमध्ये एन्ट्री