Pak vs Sl T20I Tri-Series : श्रीलंकेचे दोन खेळाडू रातोरात मायदेशी परतले; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं? बोर्डाकडून नवीन कर्णधाराची घोषणा
Pakistan, Sri Lanka and Zimbabwe T20I Tri-Series Full schedule : 18 नोव्हेंबरपासून पाकिस्तानसोबत श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 तिरंगी मालिकेला सुरुवात होणार आहे.

Sri Lanka Two Cricketers Return From Pakistan : पाकिस्तानमध्ये 18 नोव्हेंबरपासून टी20 तिरंगी मालिकेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानसोबत श्रीलंका आणि झिम्बाब्वे या तीन संघांचा समावेश आहे. पण मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंनी अचानक पाकिस्तान सोडले आहे आणि त्यामागील कारणही आता उघड झाले आहे.
इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटानंतर उडाली होती खळबळ...
याआधी पाकिस्तान–श्रीलंका वनडे मालिकेदरम्यान इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटानंतर क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर श्रीलंका संघाची सुरक्षा वाढवण्यात आली, उर्वरित दोन वनडे सामन्यांच्या तारखा एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आले. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण स्पर्धा एका शहरातच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावेळी श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी मायदेशात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पीसीबीने कडक सुरक्षा देण्याचे आश्वासन दिल्याने श्रीलंका संघाने तेव्हा पाकिस्तानातच राहण्याचा निर्णय घेतला होता.
श्रीलंकेचे दोन खेळाडू रातोरात मायदेशी परतले
तिरंगी मालिकेच्या अगदी आधीच श्रीलंका संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू कर्णधार चरिथ असलंका आणि वेगवान गोलंदाज असिथ फर्नांडो अचानक पाकिस्तानहून मायदेशी परतले. दोघेही आजारी पडल्याने त्यांना श्रीलंकेत परत बोलावण्यात आले असून या स्पर्धेत ते खेळणार नाहीत. श्रीलंका क्रिकेट (SLC) ने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. बोर्डाने स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय व्यस्त दौऱ्यांपूर्वी दोन्ही खेळाडूंना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. असलंकाच्या गैरहजेरीत दसून शनाकाला पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर असिथ फर्नांडोच्या जागी युवा वेगवान गोलंदाज पवन रत्नायकेला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेचे वेळापत्रक
श्रीलंका आपला पहिला सामना 20 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वेविरुद्ध रावळपिंडीमध्ये खेळेल. यानंतर 22 नोव्हेंबरला पाकिस्तानशी सामना होईल. 25 नोव्हेंबरला पुन्हा एकदा झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरेल आणि 27 नोव्हेंबरला पाकिस्तानशी लढत होईल. स्पर्धेचा फायनल सामना 29 नोव्हेंबरला खेळवला जाईल.
तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेचा अपडेट संघ :
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिल मिश्रा, कामिंदू मेंडिस, भानुका राजपक्षे, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, दुषण हेमंथा, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, इशान मलिंगा, पवन रत्नायके.
मालिकेचे वेळापत्रक (सर्व सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर) : (Pakistan T20I Tri-Series Full schedule Update)
18 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
20 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे
22 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
23 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
25 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे
27 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
29 नोव्हेंबर – अंतिम सामना
हे ही वाचा -





















