IND vs SL, 1st T20 Live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (24 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नुकतंच भारतीय संघानं वेस्ट इंडीजच्या संघाला टी-20 मालिकेत 3-0 नं पराभूत केलंय. तर, श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियावरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. पाच सामन्याच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेच्या संघाला ऑस्ट्रेलियाकडून 4-1 असा पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवाची खपली काढण्यासाठी श्रीलंकेचा संघ भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दोन्ही देशातील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? याबद्दल जाणून घेऊयात.


भारत-श्रीलंका पहिला टी-20 ना कधी, कुठे आणि कसा पाहायचा?
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी 20 सामना 24 फेब्रुवारी (गुरूवार) रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, संध्याकाळी सात वाजता टॉस होईल. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, लखनौ येथे हा सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध वेस्ट श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी20 सामन्याचे लाईव्ह प्रसारण 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क'वर पाहता येईल.  द्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी20 सामन्याचे Live Streaming हॉटस्टारवर पाहाता येणार आहे


कोणाचं पारड जड?
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 14 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे. भारताची विजयाची टक्केवारी 66.66 इतकी आहे. तर, श्रीलंकेच्या संघाची विजयाची टक्केवारी 33.33 इतकी आहे. 


भारत- श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी


भारत- श्रीलंका यांच्यातील टी-20 सामने कुठे खेळले जाणार?
आता श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. भारता आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका खेळण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळण्यात येणार आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha