NZ W vs IND W ODI: न्यूझीलंडविरुद्ध क्वीन्सटाउनच्या (Queenstown) जॉन डेव्हिस ओव्हल (John Davies Oval) मैदानावर खेळण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं निराशाजनक कामगिरी केली. या मालिकेतील सलग चार सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, अखेरच्या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana), हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि मिताली राज (Mithali Raj) चमकदार कामगिरी करून भारताला क्लीन स्वीपपासून वाचवलं आहे. 


या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, न्यूझीलडंच्या संघान 50 षटकात 9 विकेट्स गमावून भारतासमोर 251 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युरात भारतीय संघानं 46 षटकात 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या आणि 6 विकेट्सनं हा सामना जिंकला. या सामन्यात स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर आणि मिताली राजनं चांगली फलंदाजी केली.  हरमनप्रीत कौर (63), स्मृती मंधाना (71) आणि मिताली राज (57) यांनी शानदार फलंदाजी करत भारताची सतत सुरु असलेली पराभवाची साखळी तोडली.


या विजयासह भारताने न्यूझीलंड दौऱ्यावर पहिला विजय मिळवला आणि क्लीन स्वीपपासून थोडक्यात बचावला. महत्वाचे म्हणजे, स्मृती मंधाना या मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये उपलब्ध नव्हती. त्यामुळं भारतीय संघाला तिची कमतरता जाणवली. तसेच हरमनप्रीत कौरला मोठी धावसंख्या करण्यास अपयश येत होतं. भारतासाठी हा विजय महिला विश्वचषकापूर्वी संघाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha