IND vs SL : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात उद्यापासून (24 फेब्रुवारी) टी20 सामन्यांना सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वीच भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यानंतर आता श्रीलंकेलाही एक झटका बसला असून श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू ऑलराउंडर वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) कोरोनाबाधित झाल्यामुळे मालिकेला मुकणार आहे. त्याला कोरोनाची बाधा झाली असून अजून तो पूर्णपणे ठिक झाला नसल्याने तो तिन्ही टी20 सामन्यांना मुकणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्या उद्या लखनौ येथे पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. याआधी हसरंगाबाबत माहिती देताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून (SLC) कळवण्यात आले की,"वानिंदु हसरंगा याला कोरोनाची बाधा झाली आहे. मंगळवारी (22 फेब्रुवारी) त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली असता त्या रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे." दरम्यान श्रीलंकेचा महत्त्वाचा खेळाडू नसल्याने त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागेल.
भारतीय संघालाही दुखापतींचे ग्रहण
केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल सारखे खेळाडू आधीच दुखापतग्रस्त असल्याने टीम इंडियातून बाहेर पडले आहेत. आता सूर्यकुमार आणि दीपक चहर देखील दुखापतग्रस्त झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे विराट कोहली आणि ऋषभ पंत हे देखील श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही. दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयने सुट्टी दिली आहे. हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी
हे देखील वाचा-
- युवराज सिंगकडून कोहलीला 'खास शूज' गिफ्ट, म्हणतो,'जगासाठी तू किंग पण आमच्यासाठी चीकू'
- वेंकटेश अय्यरच्या रुपात Team India ला मिळाला नवा फिनीशर, हार्दिक पंड्याला घेऊन मीम्स व्हायरल
- IPL 2022: चेन्नईच्या संघानं सुरेश रैनाचा शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते भडकले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha