IND vs SL : श्रीलंका क्रिकेट संघ (Sri Lanka Team) भारत दौऱ्यावर आला आहे. उद्यापासून (24 फेब्रुवारी) टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेने आपला संघी जाही केला असून यामध्ये भानुका राजपक्षे याला संधी न मिळाल्याने श्रीलंकेचे क्रिकेट फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरुद्ध (SLC) आंदोलन करत श्रीलंका क्रिकेट मुख्यालयाबाहेर विरोध प्रदर्शन केलं आहे.



भानुका राजपक्षे 2021 टी20 विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर चर्चेत आला होता. त्याने नोव्हेंबर, 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने श्रीलंका संघाकडून पाच वनडे आणि 18 टी20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याच्या नावावर 89 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 320 धावा आहेत. त्याने जानेवारीमध्ये अचानक निवृत्ती घेतली, पण नंतर पुन्हा आपला निर्णय त्याने बदलला होता. दरम्यान आता त्याला संघात स्थान न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत. 



वानिंदू हसरंगाही मालिकेला मुकणार


श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू ऑलराउंडर वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) कोरोनाबाधित झाल्यामुळे मालिकेला मुकणार आहे. त्याला कोरोनाची बाधा झाली असून अजून तो पूर्णपणे ठिक झाला नसल्याने तो तिन्ही टी20 सामन्यांना मुकणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या उद्या लखनौ येथे पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. याआधी हसरंगाबाबत माहिती देताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून (SLC) कळवण्यात आले की,"वानिंदु हसरंगा याला कोरोनाची बाधा झाली आहे. मंगळवारी (22 फेब्रुवारी) त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली असता त्या रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे." दरम्यान श्रीलंकेचा महत्त्वाचा खेळाडू नसल्याने त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागेल.


भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेचं वेळापत्रक:


पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha