IPL 2022: पंजाब किंग्जच्या कर्णधारपदासाठी (Punjab Kings Captain) मयंक अग्रवाल  (Mayank Agarwal) नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पंजाबनं मेगा ऑक्शनपूर्वी मयंक अग्रवालला 12 कोटीत रिटेन केलं होतं. मयंक अग्रावालकडं पंजाबच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देणं योग्य ठरेल, असं मत माजी क्रिकेटपटूंनी देखील व्यक्त केलं होतं. 


पंजाबच्या कर्णधारासाठी शिखर धवनच्या नावाचीही चर्चा
पंजाब किंग्जच्या कर्णधारपदासाठी मयंकसोबत शिखर धवनचेही नाव घेतलं जात होतं. परंतु, ताज्या अहवालानुसार मयंकचं नाव कर्णधारपदासाठी पुढे करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. 'शिखर धवन हा नेहमीच चॅम्पियन खेळाडू राहिला आहे. त्यामुळे मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर सर्वांचं लक्ष्य होतं. पंजाब संघासोबत जोडल्यानंतर त्याचे चाहते खूश झाले होते. शिखर धवनला पंजाबचा कर्णधार करण्यात येईल, असं त्यांना वाटत होते. परंतु, के एल राहुलनं संघ सोडल्यापासून पंजाबचा संघ मयंककडं कर्णधार म्हणून पाहत असल्याचे चित्र दिसत होते.


केएल राहुलची कमतरता जाणवणार?
पंजाब संघाचा माजी कर्णधार केएल राहुल आता लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. मयंक आणि राहुलची जोडी आयपीएलमधील सर्वात मजबूत सलामीची जोडी होती. दोन्ही खेळाडूंनी मिळून पंजाबला अनेक सामन्यात विजय मिळवून दिलाय. मंयकनं मागील दोन हंगामात 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यानं 2011 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. मयंकनं आतापर्यंत 100 हून अधिक आयपीएलचे सामने खेळले आहेत. तर, भारतीय संघासाठी त्यानं 5 एकदिवसीय आणि 19 कसोटी सामने खळले. 


पंजाब किंग्जचा संघ:
मयंक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टोन, संदीप शर्मा, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, आर. चॅटर्जी, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, नॅथन एलिस, प्रेरक मंकड, इशान पोरेल, राहुल चहर, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, प्रभसिमरन सिंह, हरप्रीत ब्रार, वैभव अरोरा, अंश पटेल, राज अंगद बावा, बेनी हॉवेल, शिखर धवन, ऋषी धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha