India tour of Ireland: आयर्लंडविरुद्ध डबलिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळं हा सामना 20 षटकांऐवजी 12 षटकांचा खेळवला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं चार विकेट्स गमावून भारतासमोर 108 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतानं 9.2 षटकातच विजय मिळवून सामना जिंकला. या विजयासह भारतानं दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतासाठी आठवं षटक कसं ठरलं टर्निंग पॉइंट? दिपक हुडा आणि हार्दिक पांड्यानं कसा सामना फिरवला? यावर एक नजर टाकुयात.


भारताचा दमदार विजय 
दरमन्या, हॅरी टेक्टरच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर आयर्लंडच्या संघानं पहिल्या भारतासमोर 12 षटकात 109 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतानं 16 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. भारताकडून दिपक हुडानं 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. ज्यात दोन षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे.  त्याला इशान किशन (11 चेंडूत 26) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (12 चेंडूत 24) यांची उत्तम साथ लाभली. आयर्लंडकडून क्रेग यंगनं दोन आणि जोश लिटलनं एक विकेट घेतली.


कुठे फिरला सामना?
भारताच्या डावातील चौथ्या षटकात दिपक हुडानं मार्क एडरच्या गोलंदाजी दोन चौकार मारून फलंदाजीचा गिअर बदलला. पॉवरप्लेच्या चार षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन बाद 45 अशी होती. त्यानंतर आयर्लंडच्या कर्णधारानं या सामन्यातील सहाव्या षटकात फिरकीपटू अँडी मॅकब्राईनकडं चेंडू सोपावला. मात्र, या षटकात दीपक हुडा आणि हार्दिक पांड्यानं आक्रमक फलंदाजी करत सहाव्या षटकात 21 धावा कुटल्या. त्यानंतर दिपक हुडानं आठव्या षटकात लिटलविरुद्ध चौकार मारून हार्दिकसोबत भागीदारीचं अर्धशतक पूर्ण केलं. या षटकातच हार्दिक पांड्याच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला . हुडानं दहाव्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिक चार चेंडूत पाच धावा करून नाबाद राहिला.


हे देखील वाचा-