New Zealand tour of England: इंग्लंड आणि न्यूझीलंड (NZ vs ENG) यांच्यात लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले मैदानावर (Headingley) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जातोय. लीड्स कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाला 113 धावांची गरज आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडच्या संघाला मात करून मालिकेत 2-0 नं आघाडी घेतलीय. तर, लीड्स येथे खेळल्या जात असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.
इंग्लंडसमोर 296 धावांचं लक्ष्य
सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा अर्धा संघ माघारी परतला. किवी संघाकडे केवळ 137 धावांची आघाडी होती. डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडल यांनी चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव पुढे नेला. पुन्हा एकदा दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. पण डॅरिल मिशेल (56) बाद होताच न्यूझीलंडच्या फलंदाजी ढेपाळली आणि संघाचा डाव 326 धावांवर आटोपला . टॉम ब्लंडल नाबाद 88 धावांची खेळी केली. इंग्लंडला 296 धावांचं लक्ष्य मिळालं.
ओली पॉप आणि जो रूट यांची दमदार फलंदाजी
चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात 296 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनं आपले दोन्ही सलामीवीर 51 धावांत गमावले. परंतु येथून ऑली पॉप (81) आणि जो रूट (55) यांनी शानदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. या दोघांमध्ये 132 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं दोन विकेट्स गमावून 183 धावा केल्या.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावात डॅरिल मिशेलचं शतक
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. टॉम लॅथम शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर न्यूझीलंडच्या संघानं पाठोपाठ विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडनं 123 धावांवर पाच विकेट्स गमावल्या. त्यानंतर डॅरिल मिशेल (109) आणि यष्टिरक्षक टॉप ब्लंडल (55) यांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळला. दोघांमध्ये 120 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडनं पहिल्या डावात 329 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडनं तीन आणि जॅक लीचनं पाच विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-