IND vs NZ Test Series 2021 : भारत (IND) आणि न्यूझीलंड (NZ) यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या दोन कसोटी मालिकांच्या सिरीजमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन करत मालिका 1-0 ने जिंकली. यावेळी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या रवीचंद्रन आश्विनला (Ravichandran Ashwin) मालिकावीराचा खिताब मिळाला. अश्विनने दोन्ही सामन्यात शानदार गोलंदाजी केली. आश्विनच्या कामगिरीमुळेच पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयाजवळ पोहोचला होता. पण रचिनच्या संयमी फलंदाजीमुळे सामना ड्रॉ झाला. पण दुसऱ्या सामन्यात मात्र आर आश्विनने विकेट्सची रांग लावत भारताला एक मोठा विजय मिळवून दिला. ज्यामुळे आश्विनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान या पुरस्कारामुळे भारतीय क्रिकेटमध्ये आश्विन कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा मालिकावीर होण्याचा मान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. तर सर्वाधिक मालिकावीर मिळवणारे भारतीय कोण? यावर एक नजर फिरवूयाय...


1. रविचंद्रन अश्विन


भारतीय फिरकीपटू आणि खालच्या फळीतील फलंदाज रवीचंद्रन आश्विन या यादीत तब्बल 9 वेळा 'मालिकावीरा'चा पुरस्कार मिळवून अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडविरुद्धही आश्विनने 2 सामन्यांत 14 विकेट्स घेत मालिकावीर होण्याचा मान मिळवला. इतर सर्व भारतीयांमध्ये आश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. 


2. वीरेंद्र सेहवाग 


भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग सर्वाधिक 'मालिकावीर' मिळवण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दोन वेळा तिहेरी शतक ठोकलं आहे. ज्यामुळे तब्बल 5 वेळा मालिकावीराचा पुरस्कार सेहवागला मिळाला असल्याने तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.


3. सचिन तेंडुलकर 


जगातील सर्वाक महान फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने 1989 ते 2013 पर्यंत 74 कसोटी सामन्यात 5 वेळाच 'मालिकावीराचा' पुरस्कार मिळवला आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha