(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive: 'स्मिथ किंवा वॉर्नर नाही तर 'हे' खेळाडू आहेत कर्णधारपदाचे दावेदार, मिचेल जॉन्सन स्पष्टच म्हणाला
Mitchell Johnson : लीजेंड्स लीग क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी भारतात जगभरातील माजी दिग्गज क्रिकेटर आहेत. यावेळी माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन याने लखनौमध्ये एबीपी न्यूजशी बोलताना ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघासाठीच्या दावेदाराबाबत वक्तव्य केलं.
Mitchell Johnson about team india : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आरॉन फिंच (Aaron Finch) याने काही दिवसांपूर्वीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर अद्याप ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाला कर्णधार मिळालेला नाही. या जागेसाठी विविध दावेदार असून स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दिग्गजांचं नाव पुढे येत आहे. पण ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) याने या दोघांनाही कर्णधारपद देणं योग्य नाही, त्यापेक्षा मिचेल मार्श किंवा ग्लेन मॅक्सवेल योग्य दावेदार आहेत, असं वक्तव्य केलं आहे.
जॉन्सन हा लीजेंड्स लीग क्रिकेटचे (Legends League Cricket) सामने खेळण्यासाठी भारतात आला आहे. इंडिया कॅपिटल्स संघातून तो खेळत आहे. दरम्यान मिचेल याने लखनौमध्ये एबीपी न्यूजशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघाबाबतही दिली प्रतिक्रिया
एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना मिचेल जॉन्सन याने भारताने निवडलेल्या टी20 विश्वचषकासाठीच्या संघाबाबतही आपली प्रतिक्रिया दिली, तो म्हणाला,"भारतीय संघात आणखी एका वेगवान गोलंदाजाची गरज होती. त्यामुळे संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला संघात जागा मिळायला हवी होती. त्याला संघात न घेता राखीव खेळाडू ठेवण्यात आलं आहे, ही एक मोठी चूक ठरु शकते. तसंच भारतीय निवडकर्त्यांनी आपल्या हिशोबाने एक बॅलन्स संघ निवडला आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये सामने आहेत, ऑस्ट्रेलियात बॉल जास्त फिरत नसल्याने तिथे तीन फिरकीपटू घेणं योग्य नाही. याशिवाय ऑस्ट्रेलियात चेंडूना अधिक बॉऊन्स मिळत असल्याने आणखी एक वेगवान गोलंदाज संघात असायला हवा होता.''
इंडिया कॅपिटल्सकडून खेळताना खेळाची मजा घेतोय
यावेळी मिचेलला तु लीजेंड्स लीगमध्येही अगदी अॅग्रेशनने गोलंदाजी करणार का? असा प्रश्न विचारला. याचं उत्तर देताना जॉन्सन म्हणाला, "ते दिवस गेले.मी आता इंडिया कॅपिटल्सकडून खेळत आहे. मी बॉलला स्विंग करायचा तसंच कधी कधी एखादी शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो. मी इथे सामन्याची मजा घेण्यासाठी आलो आहे. मी खेळाची मजा घेत इथे सामने खेळत आहे.
हे देखील वाचा-