एक्स्प्लोर

Shubman Gill Century : थांबायचं नाव घेत नाही कर्णधार शुभमन गिलचं वादळ! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना तोडलं, फोडलं अन् रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला

India vs West Indies 2nd Test : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी कॅरिबियन गोलंदाजांना अक्षरशः धू धू धुतले.

Shubman Gill Century Ind vs WI 2nd Test Match : भारत आणि वेस्टइंडीज (India vs West Indies 2nd Test Day 2) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी कॅरिबियन गोलंदाजांना अक्षरशः धू धू धुतले. या सामन्यात यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 175 धावांची दमदार खेळी खेळली, तर त्याच्या पाठोपाठ आता कर्णधार शुभमन गिलनेही (Shubman Gill) शानदार शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दहावे शतक पूर्ण केले. भारताने पहिली डाव 5 बाद 518 धावा करत घोषित केली. गिल 196 चेंडूंमध्ये 129 धावा करून नाबाद राहिला.

शुभमन गिलची शानदार शतकी खेळी, एका वर्षात 5 कसोटी शतके

वेस्टइंडीजविरुद्ध गिलने जबरदस्त फलंदाजी करत 177 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार होता. शुभमन गिलच्या नावावर आता कसोटीत एकूण 10 शतके जमा झाली आहेत. या शतकासह गिलने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शुभमन गिलने या कॅलेंडर वर्षातच  5 शतके झळकावली आहेत. वेस्टइंडीजविरुद्ध हे गिलचे पहिले कसोटी शतक आहे. एका वर्षात 5 कसोटी शतके झळकावण्याचा पराक्रम भारतीय संघासाठी आतापर्यंत फक्त विराट कोहलीने (2013 आणि 2017) केला होता.

रोहित शर्माचा विक्रम मोडला, कर्णधार म्हणून अनोखा पराक्रम

गिलने या शतकासह रोहित शर्माचा विक्रम मागे टाकला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहितच्या नावावर 9 कसोटी शतके होती, पण आता गिलने आपले 10वे शतक झळकावत हा विक्रम तोडला. यासोबतच त्याने 9 शतके करणाऱ्या हॅरी ब्रूकलाही मागे टाकले आहे. तर कर्णधार म्हणून खेळलेल्या 12 डावांमध्ये गिलचे हे 5वे शतक आहे. या यादीत फक्त एलेस्टेअर कुक (9 डाव) आणि सुनील गावसकर (10 डाव) यांनीच गिलपेक्षा जलद गतीने पाच शतके पूर्ण केली आहेत.

 टीम इंडियाने 518 धावांवर डाव केला घोषित! यशस्वीनंतर गिलनेही ठोकले शतक

दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने पाच बाद 518 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि यशस्वी जैस्वालनंतर कर्णधार शुभमन गिलनेही शतक झळकावले. गिल 129 धावांवर नाबाद राहिला. ध्रुव जुरेलच्या रूपात भारताने पाचवी विकेट गमावताच संघाने डाव घोषित केला. भारताकडून यशस्वीने सर्वाधिक 175 धावा केल्या.

भारताने दुसऱ्या दिवशी 2 बाद 318 धावांवर सुरुवात केली, परंतु यशस्वी लवकर आऊट झाला, ज्यामुळे त्याचे द्विशतक हुकले. त्यानंतर गिलने नितीश रेड्डीसोबत चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. नितीश त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही आणि 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर गिलने गियर बदलले आणि वेगाने खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सत्रात त्याने त्याचे 10 वे कसोटी शतक पूर्ण केले. जुरेल देखील अर्धशतकाच्या जवळ होता, पण 44 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकनने तीन, तर रोस्टन चेसने एक विकेट घेतली.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget