IND vs ENG : 'प्रिन्स'चं दमदार कमबॅक! शतकी खेळीसह शुभमन गिल टीकाकारांना तळपत्या बॅटने उत्तर
Shubman Gill Century : दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने 131 चेंडूत शतकी खेळी करत दमदार कमबॅक केलं आहे. सध्या भारताची धावसंख्या चार विकेट गमावून 203 धावांवर आहे.
IND vs ENG, Shubman Gill Century : भारतीय क्रिकेट संघाचा 'प्रिन्स' शुभमन गिलनं (Shubman Gill) दमदार कमबॅक केलं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात युवा स्टार शुभमन गिलनं शतक ठोकलं आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यात शुभमननं शतकी खेळी करत टीम इंडियाची बाजू भक्कम केली आहे. सलामीवीर ऐवजी तिसऱ्या नंबरवर मैदानात उतरल्यानंतर पहिल्यांदा शुभमननं शतक ठोकलं आहे. यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने 300 धावांच्या पुढे आघाडी घेतली.
युवा स्टार शुभमन गिलचं कमबॅक
टीम इंडियाचा युवा स्टार शुभमन गिल सलामीवीर ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर उतरल्यापासून सतत फ्लॉप ठरल्यानंतर आज मात्र, त्याने टिकाकारांना दमदार फटकेबाजीनं उत्तर दिलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलनं शतकी खेळी केली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गिलने कठीण परिस्थितीत दमदार शतक झळकावलं. सलामी सोडल्यानंतर आणि तिसऱ्या क्रमांकावर अपयशी ठरल्यानंतर शुभमन गिलने पहिल्यांदाच मोठी खेळी केली आहे.
A determined and composed knock acknowledged by the Vizag crowd 👏👏
— BCCI (@BCCI) February 4, 2024
Well played Shubman Gill 🙌
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @ShubmanGill | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/9GkHZt4pzS
शुभमन गिलची शतकी खेळी
शुभमन गिलने 131 चेंडूत शतकं पूर्ण केलं. गिलने 147 धावांमध्ये 104 धावांची खेळी केली. यामध्ये 11 चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्यानंतर मात्र शोएब बशीरच्या चेंडूवर गिलला तंबूत परतावं लागलं.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला उतरल्यानंतर टीम इंडियाची सलामीची फळी मात्र सपशेल फेल ठरली. आघाडीच्या फळीला धावा करता आल्या नाहीत. यशस्वी जैस्वालने एक हाती द्विशतक झळकावत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. 209 धावांच्या खेळीमुळे संघाने 396 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 6 विकेट घेत इंग्लंडला 253 धावांपर्यंत मजल मारली.
गिलने कसोटीत पहिल्यांदाच केला पराक्रम
सलामी सोडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्यापासून शुभमन गिल चांगलाच अडचणीत आल्याचं दिसून येत होतं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला 12 डावात अर्धशतकही करता आलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीतील दुसरा सामन्यात गिलसाठी शेवटची संधी होती आणि या संधीचं त्याने अखेर सोनं केलं.