Shubman Gill Medical Update : शुभमन गिल दक्षिण अफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी खेळणार की नाही?; BCCI ने सगळं स्पष्ट करुन टाकलं, नेमकं काय म्हणाले?
BCCI Medical Update Shubman Gill Marathi News : शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकातातील ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यान मानेला दुखापत झाली होती.

Shubman Gill to Join Team India Guwahati : भारतीय कर्णधार शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकातातील ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यान मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पहिली डाव आणि दुसऱ्या डावातही मैदानात उतरला नाही. खेळाच्या दुसऱ्या दिवसानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथून त्याला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला.
आता मोठा प्रश्न असा आहे की, तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल का? या बाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, बीसीसीआयने सगळं स्पष्ट करुन टाकलं आहे. कोलकाता कसोटीमध्ये भारताला 30 धावांनी पराभव स्विकारावा लागला, आणि शुभमन गिलच्या अनुपस्थितीत त्याची फलंदाजीची उणीव भारतीय संघाला जाणवली.
शुभमन गिलच्या प्रकृतीबाबत अपडेट देताना BCCI ने काय सांगितलं?
शुभमन गिलच्या प्रकृतीबाबत अपडेट देताना BCCI ने सांगितलं की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला मानेला दुखापत झाली होती. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. निरीक्षणासाठी ठेवून पुढील दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. वैद्यकीय उपचारांना शुभमन सकारात्मक प्रतिसाद देत असून 19 नोव्हेंबर 2025 रोजी ते संघासोबत गुवाहाटीकडे रवाना होणार आहेत. त्याच्या प्रकृतीवर बीसीसीआयची वैद्यकीय टीम सतत लक्ष ठेवत आहे. दुसऱ्या कसोटी सामना तो खेळणार की नाही? याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
Medical Update: Shubman Gill
— BCCI (@BCCI) November 19, 2025
Team India captain Shubman Gill suffered a neck injury on Day 2 of the Kolkata Test against South Africa and was taken to the hospital for examination after the end of day's play.
He was kept under observation and discharged the next day. Shubman…
पण, प्रश्न असा आहे की जर शुभमन गिल खेळला नाही तर त्याची जागा कोण घेणार? कोलकातातील ईडन गार्डन्सवर झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने सराव केला. मंगळवारी साई सुदर्शनने सराव करताना घाम गाळला आणि गिलच्या जागी या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता दिसते. पण, नितीश कुमार रेड्डीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. जर सुदर्शनला संधी दिली तर संघात डावखुऱ्या फलंदाजांची भर पडेल, ज्याचा दक्षिण आफ्रिकेचा संघ फायदा घेऊ शकेल. नितीश रेड्डी चांगल्या फॉर्ममध्ये नाही आणि आता गौतम गंभीर काय निर्णय घेतात हे पाहायचे आहे.
भारतीय संघ या मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावला आहे. कोलकातामध्ये भारताला 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंविरुद्ध भारतीय फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. गुवाहाटीमधील एका चुकीमुळे केवळ मालिकाच महागात पडणार नाही तर संघ व्यवस्थापनावरही कडक टीका होईल.
हे ही वाचा -
Rohit Sharma IND vs SA ODI : रोहित शर्मा पुन्हा होणार वनडे संघाचा कर्णधार?, गिल, अय्यर दुखापतीमुळे बाहेर, BCCI लवकरच करणार संघाची घोषणा




















