एक्स्प्लोर

Shubman Gill Century : क्रिकेट जगत थक्क! सचिनचा वारसा शुभमन गिलने चालवला, मँचेस्टरच्या मैदानात 1990 नंतर अशी कामगिरी करणार पहिला भारतीय

Shubman Gill century Eng vs Ind 4th Test : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल याने आपल्या फलंदाजीने खळबळ उडून दिली.

Shubman Gill century Eng vs Ind 4th Test : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल याने आपल्या फलंदाजीने खळबळ उडून दिली. मँचेस्टर कसोटीत दुसऱ्या डावात त्याने झळकावलेल्या शानदार शतकामुळे भारताला सावरता आले. या मालिकेतील गिलचं हे चौथं शतक आहे, यासोबतच त्याने एक ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

मँचेस्टरमध्ये गिलची जादू

दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली होती. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीसच झटपट विकेट्स घेत भारताला दबावाखाली आणलं होतं. अशा परिस्थितीत कर्णधार गिलने संयमाने खेळ करत जबरदस्त पुनरागमन केलं. सुरुवातीला सावध खेळ करत त्याने नंतर आपल्या नेहमीच्या शैलीत आक्रमक फटकेबाजी सुरू केली. कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड शॉट्स आणि बॅकफुट पंचसारख्या फटक्यांनी त्याने इंग्लिश गोलंदाजांची झोप उडवली. गिलने 100 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 228 चेंडूंचा सामना केला.

35 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर गिलने घडवलेला पराक्रम इतिहासात नोंदवण्याजोगा ठरला. या मैदानावर यापूर्वी शेवटचा शतक 1990 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून आलं होतं. तब्बल 35 वर्षांनंतर शुभमन गिलने हे शतक झळकावत त्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. विशेष म्हणजे, भारतीय कर्णधाराकडून या मैदानावर शतक झळकवण्याचा पराक्रम मोहम्मद अझहरुद्दीन यांनी 1990 मध्ये केला होता. त्यानंतर गिलनेच हे शतक झळकावत 35 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

डॉन ब्रॅडमन अन् गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी 

गिलने या कामगिरीमुळे केवळ एकच नव्हे तर अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यशस्वी जैस्वालने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटी मालिकेत 712 धावा केल्या होत्या. आता गिल त्या आकड्यालाही मागे टाकत पुढे गेला आहे. एवढंच नाही तर, डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावसकर यांच्यानंतर एका कसोटी मालिकेत 4 शतक झळकावणारा गिल हा तिसरा कर्णधार ठरला आहे.

शुभमन गिलने केवळ उत्तम फलंदाजीच केली नाही, तर एका युवा कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये कोणती जबाबदारी कशी पार पाडावी, याचं उदाहरणही घालून दिलं आहे. मैदानावर गिलचा आत्मविश्वास, तंत्रशुद्ध फटकेबाजी आणि परिस्थितीनुसार खेळण्याची शैली ही भारतीय संघासाठी आश्वासक ठरत आहे. एकंदरीत, मँचेस्टरमध्ये गिलने केवळ शतक झळकावलं नाही, तर इतिहास घडवत स्वतःचं नाव भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली पंक्तीत नोंदवलं आहे.

हे ही वाचा -

Nitish Kumar Reddy News : टीम इंडियामधून बाहेर अन् आता थेट गुन्हा दाखल! पुरता फसला टीम इंडियाचा स्टार खेळाडू, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget