ICC ODI Batsmen Rankings : भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये (ICC ODI Team Rankings) फायदा झालाच पण सोबतच मालिका गाजवणाऱ्या शुभमन गिलला (Shubhman Gill) देखील चांगला फायदा झाला. त्याने या मालिकेनंतर आयसीसी रँकिंगमध्ये तब्बल 45 स्थानांची झेप घेत थेट 38 वं स्थान मिळवलं. याआधी अधिक एकदिवसीय सामने खेळला नसलेल्या शुभमनने झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवली आणि विषेश म्हणजे आपलं कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतकही ठोकलं ज्यामुळे त्याला इतका बंपर फायदा झाला आणि तो थेट 38 व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने मालिकेतील अखेरच्या सामन्यात 97 चेंडूत 130 रन तर त्याआधी दुसऱ्या वन डेमध्ये 33 आणि पहिल्यामध्ये नाबाद 82 रन केले होते.


याशिवाय भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने तिन्ही सामन्यात मिळून 154 धावा केल्या तरी देखील त्याच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण होऊन तो 12 व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने पहिल्या आणि तिसऱ्या वन डेमध्ये अर्धशतक लगावलं होतं. दुसरीकडे भारताकडून टॉवर म्हटलं तर माजी कर्णधार विराट कोहली 744 गुणांसह पाचव्या आणि कर्णधार रोहित शर्मा 744 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. अव्वलस्थानी पाकिस्तानचा बाबर आझम विराजमान आहे.


एकदिवसीय रँकिंमध्ये अव्वल 10 फलंदाज



  1. बाबर आझम (पाकिस्तान)

  2. रासी वान डर डस्सेन (दक्षिण आफ्रिका)

  3. क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)

  4. इमाम उल हक (पाकिस्तान)

  5. विराट कोहली (भारत)

  6. रोहित शर्मा (भारत)

  7. डेव्हीड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)

  8. जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)

  9. रॉस टेलर (न्यूझीलंड)

  10. आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया)


दुसरीकडे गोलंदाजीमध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट अव्वलस्थानी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड तिसऱ्यावर अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान, चौथ्यावर भारताचा जसप्रीत बुमराह आणि पाचव्या स्थानी पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांग्लादेशचा शाकिब अल् हसन एक नंबरवर आहे. 


हे देखील वाचा-