Wasim Akram : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापूर्वी विविध क्रिकेटतज्ज्ञ विविध प्रतिक्रिया देत आहेत. अशामध्ये आता पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसिम अक्रम यानेही भारतीय फलंदाजीबाबत वक्तव्य देत कोणता भारतीय फलंदाज पाकिस्तानसाठी धोकादायक आहे, हे सांगतिलं आहे. वसिमच्या मते भारताचा सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) हा पाकिस्तान संघासाठी सर्वात धोकादायक ठरु शकतो असं म्हटलं आहे.
आयपीएल गाजवल्यानंतर आता 23 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये सूर्याने 37.33 च्या सरासरीने 672 रन ठोकले आहेत. त्यात पाच अर्धशतकांसह अलीकडेच इंग्लंडविरुद्ध ठोकलेल्या शतकाचा समावेश आहे. त्यामुळे सूर्युकुमार पाकिस्तानसाठी मोठा धोका ठरु शकतो असं सांगताना वसिम म्हणाला, ''रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली हे आहेतच, पण सध्या मर्यादीत षटकात माझा आवडता फलंदाज ठरतोय सूर्यकुमार यादव. त्याने सर्वात आधी कोलकाता नाईट रायडर्स संघ जॉईन केला तेव्हापासून मी त्याला पाहिलं आहे. आधी 7 ते 8 स्थानावर खेळल्यानंतर सूर्याने केलेली प्रगती त्याचे अप्रतिम शॉट्स मी पाहिले आहेत. त्यामुळे यंदा तो पाकिस्तान संघासाठी सर्वात धोकादायक फलंदाज ठरु शकतो.''
कधी, कुठं रंगणार यंदीचा भारत-पाकिस्तान सामना?
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ग्रुप सामन्यानंतर सुपर फोर सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामनाही दुबईत 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
असा आहे संपूर्ण भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.
असा आहे संपूर्ण पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
हे देखील वाचा-