नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) ची फायनल जिंकून भारतानं 17 वर्षानंतर विजेतेपद मिळवलं. दक्षिण आफ्रिकेच्या हातातील मॅच भारतानं सूर्यकुमार यादवनं(Suryakumar Yadav),डेव्हिड मिलरच्या (David Miller) अफलातून कॅचच्या जोरावर खेचून आणली होती. सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या कॅचवर काहीजणांनी आक्षेप घेतले होते. सूर्याचा पाय सीमारेषेच्या कुशनला लागल्याचा दावा करण्यात येत होता. सोशल मीडियावर यासंदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात होते. अखेर या प्रकरणावर दक्षिण आफ्रिकेचा महान माजी खेळाडू, वेगवान गोलंदाज शॉन पोलॉक यानं पडदा टाकला आहे. सूर्यकुमार यादवचं त्या कॅचसाठी कौतुक देखील शॉन पोलॉक (Shaun Pollock) यांनी केलं आहे. 
  
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. रोहित शर्मानं  बॉल हार्दिक पांड्याच्या हातात दिला होता. स्ट्राईकवर आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर  होता. हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर 20 व्या ओव्हरमध्य सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या डेव्हिड मिलरच्या कॅचमुळं कोट्यवधी भारतीयांचं टी 20 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. सूर्यकुमार यादवनं घेतलेला अफलातून कॅच गेमचेंजर ठरला होता. याच कॅचचे  व्हिडीओ दाखवून दावे प्रतिदावे करण्यात आले होते. सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या ऐतिहासिक कॅचवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. सूर्याचा शूज सीमारेषेवरील कुशनला लागल्याचा दावा काही जण करत वाद निर्माण करत होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू शॉन पोलॉक यानं या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. सूर्यकुमारच्या कॅचला त्यांनी क्लीन चीट दिली आहे.


पाहा व्हिडीओ :






शॉन पोलॉक काय म्हणाले?


डेव्हिड मिलरच्या सूर्यकुमार यादवनं घेतलेला कॅच अप्रतिम होता. सीमारेषेचं कुशन हललं नव्हतं. सूर्यकुमार यादव कुशनवर उभा नव्हता. सूर्यकुमार यादवनं अप्रतिम कौशल्य दाखवत कॅच घेतला, असं म्हणत शॉन पोलॉक यांनी सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं. डेव्हिड मिलरच्या कॅचवरुन सुरु झालेल्या वादावर पडदा टाकला. 


मॅचनंतर डेव्हिड मिलर रडला


टी 20 क्रिकेटमधील सर्वात आक्रमक आणि गोलंदाजांच्या दृष्टीनं धोकादायक फलंदाज अशी डेव्हिड मिलरची ओळख आहे. मात्र, तो संघाला टी 20 वर्ल्ड कप मिळवून देऊ शकला नाही. सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या अप्रतिम कॅचमुळं तो बाद झाला. सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या कॅचची तुलना 1983 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमधील कपिल देव यांच्या कॅचसोबत केली जात आहे. 


संबंधित बातम्या :