Team India T20 Captain : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारताने टी20 विश्वचषकाला गवसणी घातली. कर्णधार (Captain) रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने 17 वर्षांनंतर भारतीयांना हा 'सोनियाचा' दिवस दाखवला. रोहितसेनेने भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्मा टी20 विश्वचषक जिंकणारा दुसरा कर्णधार ठरला. टी20 विश्वचषकात विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठी घोषणा केली. रोहित शर्माने विश्वचषकातील विजयानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता रोहित शर्माच्या रिटायरमेंटनंतर टी20 फॉरमॅटमध्ये कॅप्टन कोण असा, प्रश्न सर्वांना पडला आहे.


रोहित शर्मानंतर T20 संघाचा कर्णधार कोण? 


रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता टीम इंडियाला या फॉरमॅटसाठी नवा कर्णधार मिळणार आहे. टी20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टी20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपदासाठी तीन नावे चर्चेत आहेत. रोहित शर्मानेही निवृत्ती जाहीर केली. अशा परिस्थितीत रोहितनंतर टी-20 संघाचं कर्णधारपद कोण सांभाळणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत या तीन पर्याय आहेत.


हार्दिक पांड्या शिवाय तर आणखी दोन नावे चर्चेत


रोहित शर्मानंतर, टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधार पदासाठी हार्दिक पांड्या एक दावेदार आहे. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर हार्दिक पांड्याने टीम इंडियासाठी शानदार पुनरागमन केलं आहे. भारताला विश्वविजेता बनवण्यात हार्दिक पांड्या याने सर्वात महत्त्वाची कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार होता. टी20 संघाच्या कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार हार्दिक पांड्या असेल.


ऋषभ पंत प्रबळ दावेदारांपैकी एक


टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत. अपघातातून परतल्यानंतर पंत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. ऋषभने टी20 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली. मात्र, बाद फेरीत पंतला खास फलंदाजी करता आली नाही. ऋषभ पंत आयपीएलमध्ये दीर्घकाळ दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. अशा स्थितीत भविष्य डोळ्यासमोर ठेवून ऋषभ पंतला कर्णधारपद मिळू शकते.


बुमराहची टी20 मध्ये शानदार कामगिरी


ऋषभ पंत व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह देखील टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा आघाडीची दावेदार मानला जात आहे. बुमराह टी20 फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. बुमराहने टी-20 विश्वचषकातील विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे बुमराह टी-20 संघाचा कर्णधार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अशात आता बीसीसीआय टी20 संघाचा कर्णधार म्हणून कुणाला संधी देणार, हे पाहावं लागणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर