World Test Championship 2025 Most Runs : इंग्लंडविरुद्धच्या मुलतान कसोटीत पाकिस्तानने दमदार सुरुवात केली आहे. सोमवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानकडून शान मसूदने शतक झळकावले. यानंतर अब्दुल्ला शफीकनेही शतक झळकावले. या दोघांमध्ये द्विशतकी भागीदारी झाली. पाकिस्तानच्या या दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं. पाकिस्तानने पहिल्या डावात 250 हून अधिक धावा केल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शान मसूदचे शतक हे ऐतिहासिक आहे, त्याने कर्णधार म्हणून झळकावले आहे. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्याबाबत त्याने भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाललाही मागे टाकले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज इंग्लंडचा जो रूट आहे. त्याने आतापर्यंत चार हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, यशस्वी जैस्वालने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत आणि या काळात त्याने आपल्या बॅटने 1217 धावा केल्या आहेत. येथे त्याची सरासरी 64.05 आहे आणि तो 71.67 च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहे. या चॅम्पियनशिपमध्ये त्याने आतापर्यंत तीन शतके आणि 7 अर्धशतके केली आहेत. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटीपूर्वी शान मसूदने यशस्वी जैस्वालला मागे टाकले.
शान मसूदबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 21 सामन्यांच्या 37 डावांत 1220 धावा केल्या आहेत. येथे त्याची सरासरी 33.88 आहे आणि तो 58.65 च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहे. मात्र, तो आता फलंदाजी करत आहे, त्यामुळे यात काही बदल होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची मालिका सुरू आहे. ज्याचा पहिला सामना सध्या सुरू आहे. लवकरच, म्हणजेच या महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यामध्ये यशस्वी जैस्वाललाही शान मसूदला मागे टाकण्याची संधी असेल. म्हणजेच शान मसूद विरुद्ध यशस्वी जैस्वाल यांच्यातील ही लढत खूपच रंजक असणार आहे. शेवटी कोण बाजी मारतो हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा -