'रजा'मंदी... भारतीय हिंदू कन्येचा पाकिस्तानी क्रिकेटर्ससोबत होणार निकाह; धर्म बदलण्यावरही स्पष्टच सांगितलं
भारतातील आणखी एक मुलगी पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करणार आहे. पूजा बोमन असे या मुलीचे नाव असून ती न्यूयॉर्कमध्ये राहते. पाकिस्तानी फिरकीपटू रझा हसनसोबत पूजा पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरझा हसन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, पूजा बोमन हिंदू आहे आणि ती तिचा धर्म बदलण्यासही तयार आहे.
रझा हसनने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये पूजा हासनसोबत तिची एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे. दोघांनी समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट केले. त्याने लाल रंगाचा कुर्ता घातला आहे, तर पूजा वाईन कलरच्या सूटमध्ये दिसत आहे.
दैनिक भास्करमधील बातमीनुसार, रजा हसनने सांगितले की, पूजा तिचा धर्म बदलण्यासाठी तयार आहे. ती हिंदू धर्म सोडून इस्लामचा स्वीकार करेल.
रझा हसन पाकिस्तानसाठी फक्त एक वनडे सामना खेळला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात त्याने 1 बळी घेतला.
रझा हसनने पाकिस्तानसाठी 10 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 10 विकेट्स घेतल्या आहेत.