Indian Gymnast Dipa Karmakar announces Retirement : भारताची जिम्नॅस्टिक स्टार दीपा करमाकर हिने निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली. दीपा हीने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी देशातील पहिली महिला जिम्नॅस्टिक दीपा वॉल्ट स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिली. तिचे ऑलिम्पिक पदक केवळ 0.15 गुणांनी हुकले होते. त्याची कामगिरी थक्क करणारी होती. प्रोड्युनोव्हा करताना तिने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
2018 मध्ये या स्पर्धेत तिने रचला इतिहास
2018 मध्ये, तिने तुर्कीमधील मर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली जिम्नॅस्ट ठरली. त्यानंतर 31 वर्षीय दीपाला गोल्डन गर्ल म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
दीपाने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. तिने X वर एक पोस्ट शेअर केले. ज्यामध्ये तिने लिहिले की, '‘खूप विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला. मी जिम्नॅस्टीक्समधून निवृत्ती घेत आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नक्की नव्हता, परंतु हिच ती योग्य वेळ आहे. जिम्नॅस्टीक्स हा माझ्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि मी हा प्रवास एन्जॉय केला. मला आठवते मी पाच वर्षांची असताना मला सांगितले होते की, तु सपाट पायांमुळे कधीच जिम्नॅस्ट बनू शकत नाही. आज मला हे यश पाहून खूप अभिमान वाटतो.
दीपाने सांगितले निवृत्तीचे कारण
दिपा हीने पत्राद्वारे निवृत्तीचे कारण सांगितले आहे. तिने लिहिले, 'माझा शेवटचा विजय, ताश्कंदमधील आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप हा एक टर्निंग पॉइंट होता. तोपर्यंत मला वाटले की मी माझ्या शरीराला आणखी पुढे ढकलू शकेन. परंतु कधीकधी आपले शरीर आपल्याला सांगते की विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पण मन अजूनही पटत नाही.
महिलांच्या जिम्नॅस्टिक्समध्ये दिपाचे यश
- आशियाई चॅम्पियनशिप-2024 मध्ये सुवर्ण
- वर्ल्ड कप 2018 मध्ये सुवर्ण
- वर्ल्ड कप 2018 मध्ये कांस्यपदक
- आशियाई चॅम्पियनशिप 2015 मध्ये कांस्यपदक
- कॉमनवेल्थ गेम्स 2014 मध्ये कांस्य
हे ही वाचा -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उतरले क्रिकेटच्या मैदानात; Sweep Shot पाहून सर्वच अवाक, पाहा Video