IPL 2025 Mumbai Indians : आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव होणार आहे. याआधी बीसीसीआयने रिटेन्शन नियम जाहीर केले आहेत, ज्यानुसार एक संघ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतो. हा नियम मोठ्या संघांच्या बाजूने आहे, कारण ते संघात दिग्गज खेळाडू कायम ठेवू शकतात. पण, कायम ठेवण्याच्या नियमामुळे मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे.


बीसीसीआयच्या नियमांनुसार, आयपीएल 2025 मध्ये एक संघ जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेऊ शकतो. या कालावधीत पहिल्या रिटेन्शन खेळाडूला 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवावे लागेल. पण, सध्या मुंबईकडे असे 4 मोठे खेळाडू आहेत ज्यांना ते कायम ठेवू इच्छितात, परंतु त्याआधी प्रश्न असा आहे की ते कोणाला कायम ठेवणार?


संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या, माजी कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नावे या यादीत समाविष्ट होणार आहेत. ज्यांना फ्रेंचायझीला कामय ठेवायचे आहे.


5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी कायम ठेवण्यासाठी खेळाडूंची निवड करणे सोपे नाही, कारण एकापेक्षा एक भारी खेळाडू त्यांच्या संघात आहे. मात्र, त्याआधी संघाला पुढील हंगामासाठी संघाची कमान कोणाकडे सोपवायची याबाबतची रणनीती स्पष्ट करावी लागणार आहे.


जर त्याने हार्दिकला कर्णधारपदी कायम ठेवले तर, त्यांना 18 कोटी रुपये देऊन हार्दिकला पहिला रिटेन्शन म्हणून कायम ठेवावा लागेल. त्याचवेळी, जर ते रोहित, जसप्रीत बुमराह किंवा सूर्यकुमार यादव यांना कर्णधारपद देण्याचा विचार करत असेल तर तो त्यांना 18 कोटी रुपये देऊ शकतो.


IPL 2025 मध्ये कोण असेल कर्णधार?


आयपीएल 2025 मध्ये अनेक संघांचे कर्णधार बदलणार असले तरी चाहत्यांना मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची सर्वाधिक उत्सुकता आहे. मुंबई हार्दिक पांड्याला हटवून संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवू शकते अशी बातमी आहे. पण कर्णधार कोण होणार हे येणारा काळच सांगेल. 


रिटेन्शन पॉलिसीवर नजर टाकल्यास लिलावापूर्वी एक संघ 18 कोटी रुपयांमध्ये 2 खेळाडू, 14 कोटी रुपयांमध्ये 2 खेळाडू आणि 11 कोटी रुपयांमध्ये एक खेळाडू कायम ठेवू शकतो. सूर्यकुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे तिघेही खेळाडू 18 कोटी रुपयांच्या मानधनास पात्र आहेत. त्याच्या व्यतिरिक्त, रोहित शर्माला गेल्या मोसमात कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले असले तरी, रोहित देखील 18 कोटी पगारासह स्लॉटसाठी पात्र आहे.


रिटेन्शन पॉलिसीमध्ये असे म्हटले आहे की 18 कोटी रुपयांमध्ये फक्त 2 खेळाडूंना कायम ठेवता येईल. स्पष्टपणे सांगायचे तर, कायम ठेवलेल्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने केलेल्या पगाराच्या स्लॉटमुळे, एमआयला सूर्या, हार्दिक आणि बुमराह यांना एकत्र ठेवणे जवळजवळ अशक्य दिसते. जर एखाद्या फ्रँचायझीने 5 कॅप्ड खेळाडू आणि एक अनकॅप्ड खेळाडू ठेवला तर फक्त 6 खेळाडूंमुळे त्याची पर्स 79 कोटी रुपयांनी रिकामी होईल. अशा परिस्थितीत उर्वरित संघाच्या तयारीसाठी संघ व्यवस्थापनाकडे केवळ 41 कोटी रुपये शिल्लक असतील.


हे ही वाचा - 


'रजा'मंदी... भारतीय हिंदू कन्येचा पाकिस्तानी क्रिकेटर्ससोबत होणार निकाह; धर्म बदलण्यावरही स्पष्टच सांगितलं


Preity Zinta: दुष्काळ संपला, ट्रॉफी जिंकली; प्रीती झिंटाच्या संघाने मैदाना मारलं, क्रिकेटविश्वात घातला धुमाकुळ, Video