ICC Ranking : शाहीनची मोठी झेप, सिराज-हेजलवूडला धक्का देत काबिज केले अव्वल स्थान
Shaheen Shah : विश्वचषकाची धामधूम सुरु असतानाच आयसीसीने वनडेची रॅकिंग जारी केली आहे.
Shaheen Shah Afridi becomes the number 1 ranked ODI bowler in the World : विश्वचषकाची धामधूम सुरु असतानाच आयसीसीने वनडेची रॅकिंग जारी केली आहे. गोलंदाजीमध्ये शाहीन आफ्रिदीने सर्वांनाच मागे टाकत वनडेतील अव्वल स्थान काबिज केलेय. यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी सरासरी राहिली आहे, पण शाहीनने अव्वल कामगिरी केली आहे. त्याचेच बक्षीस त्याला मिळाले आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीत शाहीन आफ्रिदीने अव्वल गोलंदाज ठरलाय. शाहीन आफ्रिदीने सात अंकाची झेप घेतली आहे. आठव्या क्रमांकावर असणारा शाहीन आफ्रिदी पहिल्या स्थानावर विराजमान झालाय. हेजलवूड, मोहम्मद सिराज, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट यांच्यासह राशीद खान यांची क्रमवारीत घसरण झाली आहे. मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानावर घसरलाय.
Shaheen Shah Afridi becomes the number 1 ranked ODI bowler in the World.
— Johns. (@CricCrazyJohns) November 1, 2023
- The dominance of the Eagle....!!!! pic.twitter.com/VyKRSz9hYo
शाहीन आफ्रिदीची विश्वचषकातील कामगिरी -
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोंलदाजात शाहीन आफ्रिदी पहिल्या क्रमांकावर आहे. शाहीन आफ्रदीने विश्वचषकाच्या सात सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत विश्वचषकात त्याने शानदार कामगिरी केली आहे.
शाहीन आफ्रिदीची वनेडतील कामगिरी -
23 वर्षीय शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानसाठी आतापर्यंत भेदक मारा केला आहे. 50 एकदिवसीय सामन्यात त्याने 102 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत 23 षटके निर्धाव फेकली आहेत. त्याशिवाय 5 विकेट्स तीन वेळा घेतल्या आहेत. तसेच चार विकेट्स सहा वेळा घेण्याचा पराक्रमही शाहीन आफ्रिदीने केलाय. 35 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट्स ही शाहीनची कामगिरी वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
आयसीसी क्रमवारीतील आघाडीचे 12 गोलंदाज -
शाहीन आफ्रिदी, पाकिस्तान - 673 रेटिंग गुण
जोश हेजलवूड, ऑस्ट्रेलिया - 663 रेटिंग गुण
मोहम्मद सिराज, भारत - 656 रेटिंग गुण
केशव महाराज, दक्षिण आफ्रिका - 651 रेटिंग गुण
ट्रेंट बोल्ट, न्यूझीलंड - 649 रेटिंग गुण
राशीद खान, अफगाणिस्तान - 648 रेटिंग गुण
कुलदीप यादव, भारत - 646 रेटिंग गुण
मुजीब आर रेहमान, अफगाणिस्तान - 641 रेटिंग गुण
अॅडम झम्पा, ऑस्ट्रेलिाय - 637 रेटिंग गुण
मोहम्मद नबी, अफगाणिस्तान - 631 रेटिंग गुण
जसप्रीत बुमराह, भारत - 629 रेटिंग गुण
मॅट हेनरी, न्यूझीलंड - 619 रेटिंग गुण