(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanju Samson : न्यूझीलंडविरुद्ध संजू सॅमसन सज्ज, पहिल्या टी20 पूर्वी नेट्समध्ये दमदार फटकेबाजी, पाहा VIDEO
India vs New zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यावेळी बऱ्याच काळानंतर संजूला संघात पुन्हा स्थान मिळालं आहे.
Sanju Samson in Team India : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान यावेळी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून काही खेळाडू संघात पुनरागमनही करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे संजू सॅमसन (Sanju Samson).
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि कोणत्याही ठिकाणी दमदार फलंदाजी करण्याची ताकद असणाऱ्या संजूला बऱ्याच काळानंतर संघात पुन्हा स्थान मिळालं आहे. दरम्यान संजूही या मालिकेसाठी कसून सराव करत असून नेट प्रॅक्टिस करतानाचा त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी संजूने सरावादरम्यान अगदी तगडे शॉट्स खेळल्याचं पाहायला मिळालं. बीसीसीआयने ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये भारतीय खेळाडू सराव करताना दिसत आहेत. यावेळी संजूने देखील सरावादरम्यान नेटमध्ये विविध प्रकारचे दमदार शॉट्स खेळले. त्याच्यासोबत ऋषभ पंतही फॉर्मात दिसत होता. तर कर्णधार पांड्याने गोलंदाजी आणि फलंदाजी असा दोन्हीचा सराव केला.
पाहा VIDEO-
TICK..TICK..BOOM 💥💥
— BCCI (@BCCI) November 17, 2022
All charged up for the #NZvIND T20I series opener#TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/AsNSTeMqq8
कसं आहे टी-20 मालिकेच वेळापत्रक?
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
कसं आहे एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक?
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च |
टी20 मालिकेसाठी कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ :
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड संघ :
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी
हे देखील वाचा-