Sanju Samson Video : 6,6,6,6,6... संजूचा हैदराबादमध्ये रन तांडव; एकाच षटकात ठोकल्या 30 धावा, बांगलादेश गोलंदाज आले रंडकुडीला
IND vs BAN 3rd t20 Sanju Samson : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी हैदराबादच्या मैदानावर खेळवला जात आहे.
IND vs BAN 3rd t20 Sanju Samson Video : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी हैदराबादच्या मैदानावर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत पाचव्या षटकातच 50 धावांचा टप्पा पार केला. अभिषेक शर्माची विकेट गमावल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सॅमसन यांनी भारताला वेगवान सुरुवात करून दिली. दरम्यान, संजू सॅमसनने 22 चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले.
तनझिम हसन साकिबने अभिषेक शर्माला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. अभिषेक चार धावा करून बाद झाला. शाकिबच्या चेंडूवर अभिषेकने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू हवेत गेला आणि मेहदी हसनने त्याचा झेल घेतला. नंतर सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी केल्यामुळे पॉवरप्लेअखेर भारताने एका विकेटच्या मोबदल्यात 82 धावा केल्या. टी-20 मधील पॉवरप्लेमध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्यकुमार आणि सॅमसन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे.
संजू सॅमसनने एकाच षटकात ठोकल्या 30 धावा
10वे षटक टाकण्यासाठी आलेल्या रिशादवर भारताचा सलामीवीर संजू सॅमसनने सलग पाच चेंडूत पाच षटकार ठोकले आणि एकूण 30 धावा केल्या. सॅमसनने पहिल्या चेंडूवर एकही धाव काढली नाही, तर पुढच्या पाच चेंडूवर गगनचुंबी षटकार मारले.
6⃣6⃣6⃣6⃣6⃣
— BCCI (@BCCI) October 12, 2024
It's raining sixes in Hyderabad, courtesy @IamSanjuSamson 💥
Live - https://t.co/ldfcwtHGSC#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5r02FhiFw3
संजू सॅमसनने 22 चेंडूत ठोकले तुफानी अर्धशतक
संजू सॅमसनने गेल्या दोन सामन्यातील निराशा मागे टाकत बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतक झळकावले. सॅमसनने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. या दोन फलंदाजांच्या शानदार खेळीमुळे भारताने आठव्या षटकातच 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव.
बांगलादेश : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, तौहीद हरदोय, महमुदुल्लाह, मेहदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब.