एक्स्प्लोर

England vs West Indies | आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात, खेळाडूंना 'हे' नियम पाळावे लागणार!

तब्बल 117 दिवसांनी आजपासून आंतररा्ष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये पहिला कसोटी सामना साऊदम्पटन खेळवला जाणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना विशेष काळजी घ्यावी लागणार आहेच पण नियमही पाळावे लागतील.

इंग्लंड : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेद्वारे चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी क्रिकेटचा अनुभव पूर्णत: वेगळा असेल. खेळाडूंना मैदानासह ते राहत असलेल्या हॉटेलवरही नियम पाळावे लागणार आहेत.

रिझर्व्ह खेळाडू बॉल बॉय म्हणून काम करतील तर स्टम्प्स आणि बेल्स साफ करण्यासाठी ब्रेक घेतला जाईल. याशिवाय पीपीई किटसह पत्रकार आणि फोटोग्राफर्स सामन्याच वार्तांकन आणि चित्रीकरण करीत. इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमधील ही समान्य कसोटी आजपासून अशा अंदाजात सुरु होईल.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये आजपासून कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. साऊदम्पटनच्या एजेस बाऊद मैदानात हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. विशेष म्हणजे क्रिकेटपटू मैदानात असले तरी त्यांना चिअर करण्यासाठी प्रेक्षक मात्र स्टेडियममध्ये नसतील. कोरोना व्हायरसमुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

England vs West Indies | चार महिन्यांनी क्रिकेटपटू मैदानात मात्र चिअर करण्यासाठी प्रेक्षक नाहीत!

मैदानावर कोणते नियम पाळावे लागणार?

- रिझर्व्ह खेळाडू बॉल बॉयचं काम करणार

- स्टम्प्स आणि बेल्स साफ करण्यासाठी ब्रेक घेणार

- पीपीई किट घालून पत्रकार आणि फोटोग्राफर्स मॅच कव्हर करणार

- केवळ दोन्ही संघाचे कर्णधार आणि सामनाधिकारी नाणेफेकीसाठी बाहेर जाणार

- नाणेफेकीदरम्यान कोणताही कॅमेरा नसेल किंवा शेकहॅण्डही केलं जाणार नाही

- पंच स्वत:च्या बेल्स घेऊन मैदानात जातील

- खेळाडू एकमेकांचे ग्लोव्ज, शर्ट, पाण्याची बाटली, बॅग किंवा स्वेटर वापरु शकणार नाहीत

- खेळाडू गळाभेट घेऊ शकणार नाहीत

ग्राऊंड स्फाफ मैदानावर खेळाडूंच्या 20 मीटरच्या कक्षेत जाणार नाही. इथे दोन चौरस फुटांच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करावं लागेल.

- स्कोअरर पेन किंवा पेन्सिल शेअर करु शकणार नाही

- आयसीसीने आधीच चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली आहे. दोन इशाऱ्यानंतर पाच धावांचा दंड लावला जाईल.

- जर षटकारानंतर चेंडू स्टॅण्डमध्ये गेला तर ग्लोव्ज घातलेले खेळाडूच तो फेकू शकतात. इतर कोणालाही चेंडूला हात लावण्याची परवानगी नसेल.

- आठवड्यातून दोन वेळा खेळाडूंची कोरोना चाचणी होईल, तसंच खेळाडू हॉटेलबाहेर जाऊ शकणार नाहीत

याशिवाय खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत तिथले दरवाजे एका अॅपद्वारे उघडण्याची सोय आहे, ज्यात हॅण्डला हात लावण्याची गरज नाही. तसंच खेळाडूंना कोणतीही रुम सर्विस नसेल किंवा लिफ्टही नसेल.

सामना कुठे पाहता येणार? सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कच्या माहितीनुसार, भारतात या मालिकेचं थेट प्रक्षेपण आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून सोनी सिक्सच्या चॅनल्सवर केलं जाईल. ही मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जाई. क्रिकेट चाहतेही या मालिकेची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल.

या ऐतिहासिक सामन्यासाठी दोन्ही संघाच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हनवर नजर टाकूया...

इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), जाक क्रॉली, जो डेनली, ओली पोप, डॉम सिबली, क्रिस वोक्स, मार्क वूड.

वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, एन बोनर, क्रेग ब्रेथवेट, शामराह ब्रुक्स, जॉन कँबेल, रॉस्टन चेज, रकीम कॉर्नवेल, शेन डाऊरिच (यष्टीरक्षक), शॅनन गॅब्रिएल, चेमर होल्डर, शाय होप, अलजारी जोसफ, रेमन रीफर, कीमर रोच.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिका वेळापत्रक

पहिली कसोटी - 8 जुलै ते 12 जुलै, साऊदम्पटन

दुसरी कसोटी - 16 जुलै ते 20 जुलै, मॅन्चेस्टर

तिसरी कसोटी - 24 जुलै ते 28 जुलै, मॅन्चेस्टर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Survival Thriller Web Series: आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या  OTT वर करतेय ट्रेंड
आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या OTT वर करतेय ट्रेंड
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Embed widget