Hansa Researchs Brand Endorser Report 2022 : हंसा रिसर्चने नुकताच ब्रँड एंडोर्सर रिपोर्ट 2022 (Brand Endorser Report 2022) शेअर केला आहे, यामध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्स सेलिब्रिटी ठरला आहे. या अहवालात क्रीडाविश्वासह चित्रपट, टीव्ही, संगीत, सोशल मीडिया अशा विविध क्षेत्रातील एकूण 550 हून अधिक सेलिब्रिटींचा समावेश आहे. यामध्ये सर्व कॅटिगरींचा विचार करता अमिताभ बच्चन अव्वल स्थानावर आहे.


हंसा रिसर्चच्या या ब्रँड एंडोर्सर रिपोर्टनुसार आजही भारतीय जाहिरात विश्वातील क्रीडा कॅटेगरीचा विचार करता सर्वाधिक पसंती मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आहे. त्यामुळे सचिन क्रिकेटच्या मैदानावरीलच नाही तर जाहिरात विश्वातीलही किंग आहे. तेंडुलकर पाठोपाठ विराट कोहली आणि एमएस धोनी या दोघांचा नंबर लागतो. ब्रँड एंडोर्सरच्या या अहवालासाठी भारताच्या 36 शहरांमध्ये संशोधन करण्यात आलं. यातील सिंडिकेटेड अभ्यासानुसार, सचिन तेंडुलकर 84% गुणांसह क्रीडा विश्वातील सर्वात प्रसिद्ध आणि अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. या अहवालाबद्दल बोलताना हंसा रिसर्चचे कार्यकारी उपाध्यक्ष आशिष कर्नाड म्हणाले, “आमच्या या अहवालातून आम्ही ब्रँड एंडोर्सर म्हणून कोणत्याही ब्रँडचं दमदार ब्रँडिंग करण्यात अव्वल असणाऱ्या सेलिब्रेटींची यादी समोर आणली आहे.''


या अहवालात क्रीडाविश्वात सचिन अव्वल स्थानी असून त्याने विराट, रोहित, हार्दिक, जाडेजा अशा दिग्गजांना मागे टाकलं आहे. या यादीत महिला खेळाडूंचा विचार करता टॉप10 मध्ये केवळ एक भारतीय सानिया मिर्झा ही आहे. दरम्यान विविध कॅटेगरीच विचार करता सुपरस्टार अमिताभ बच्चन अवल्लस्थानी आहे. तर नेमकी यादी कशी आहे पाहूया...



  •  क्रीडा विश्वात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एक नंबरला असून त्यानंतर धोनी आणि विराटचा नंबर लागतो.

  • टीव्ही विश्वाचा विचार करता पुरुषांमध्ये कपिल शर्माचा तर महिलांमध्ये मौनी रॉयचा नंबर लागतो.

  • सोशल मीडिया सेलिब्रेटींमध्ये भुवन बम एक नंबरला आहे.

  •  दाक्षिणात्य सेलिब्रेटींमध्ये अल्लू अर्जून आणि संमाथा प्रभू अव्वल स्थानी आहेत. 



हे देखील वाचा -