LLC 2022: लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket) क्वालिफायर सामन्यात भिलवाडा किंग्ज आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात (Bhilwara Kings vs India Capitals) रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या या सामन्यात षटकार आणि चौकारांचा वर्षाव पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 450 हून अधिक धावा केल्या. अखरे इंडिया कॅपिटल्सनं हा सामना जिंकला. परंतु, युसूफ पठाण (Yusuf Pathan) आणि मिचेश जॉनसन (Mitchell Johnson) यांच्यातील वादानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
भिलवाडा किंग्जचा युसूफ पठाण आणि इंडिया कॅपिटल्सचा मिचेश जॉनसन यांच्यात भरमैदानात बाचाबाची झाली. दोघांमधील वाद इतका पेटला की, दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हा वाद मिटवण्यासाठी मैदानावरील पंचांना मध्यस्ती करावी लागली. युसूफ आणि जॉनसनच्या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओ-
युसूफ पठाण आणि यांच्यात भरमैदानात राडा
भिलवाडा किंग्जच्या डावातील 19 व्या षटकात मिचेश जॉनसननं युसूफ पठाणला डिवचलं. यावर युसूफ पठाणनंही त्याची प्रतिक्रिया दिली. ज्यानंतर दोघांमधील वादाला सुरुवात झाली. एवढेच नव्हे तर, मिचेल जॉनसेननं युसूफ पठाणला भरमैदानात धक्का दिला. ज्यामुळं मैदानातील पंचांसह खेळाडूंनाही मध्यस्ती करावी लागलीय. मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ आणि मिचेश यांच्यातील वादानंतर लीजेंड्स लीग क्रिकेच्या व्यवस्थापकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मिचेश जॉनसनवर एक सामन्याची बंदी घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इंडिया कॅपिटल्सचा भिलवाडा किंग्जवर चार विकेट्सनं विजय
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भिलवाड किंग्जनं इंडिया कॅपिटल्ससमोर 226 धावांचं लक्ष्य ठेवलं. ज्यात शेन वॉटसन (65 धावा) आणि युसूफ पठाणच्या (48 धावा) वादळी खेळीचा समावेश आहे. प्रत्युत्तरात गौतम गंभीरच्या नेतृत्वात इंडिया कॅपिटल्सनं भिलवाडा किंग्जचा चार विकेट्स राखून विजय मिळवलाय.
लीजेंड्स लीग क्रिकेटचा अंतिम सामना कधी?
लीजेंड्स लीग क्रिकेटचे क्वालिफायर सामने खेळले जात आहेत. इंडिया कॅपिटल्सनं फायनलचं तिकिट निश्चित केलं आहे. आज इंडिया कॅपिटल्स आणइ भिलवाडा किंग्ज यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ फायनमध्ये इंडिया कॅपिटल्सशी अंतिम सामना खेळणार आहे. लीजेंड्स लीग क्रिकेटचा अंतिम सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा-