एक्स्प्लोर

Road Safety World Series: सचिनची दमदार खेळी, 42 चेंडूत 65 धावा; इंडिया लिजेंड्सची फायनलमध्ये धडक

सचिन तेंडुलकरने या सामन्यात 42 चेंडूंवर 65 धावांची दमदार खेळी केली. या खेळात सचिनने 6 चौके आणि तीन षटकार लगावले.

Cricket News | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदान गाजवताना दिसत आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिनने पुन्हा एकदा धडाकेबाज अर्धशतक साजरं केलं आहे. वेस्ट इंडिज लिजेंड्स विरोधात टॉस हारत इंडिया लिजेंड्स संघ मैदानात प्रथम फलंदाजी करायला उतरला. लिजेंड्स इंडियाने 3 विकेट्स गमावत 218 धावांचा डोंगर उभारला. सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिज लिजेंड्सला पराभूत करत इंडिया लिजेंड्सने फायनलमध्ये धडक मारली आहे.

सचिन तेंडुलकरने या सामन्यात 42 चेंडूंवर 65 धावांची दमदार खेळी केली. या खेळात सचिनने 6 चौके आणि तीन षटकार लगावले. सचिनसोबत युवराज सिंगही सामन्यात चमकला. युवराजने 49 धावांची नाबाद खेळी केली. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. सेहवागने पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 17 चेंडूत 35 धावांची खेळी केली. लिजेंड्स इंडियाची धावसंख्या 56 असताना पहिला धक्का बसला.

सेहवाग बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने मौहम्मद कैफच्या मदतीने लिंजेंड्स इंडियाची खेळी सुरु ठेवली. दोघांनी मिळून धावसंख्या 100 पार नेली. मोहम्मद कैफने 21 चेंडूत 27 धावांची खेळी केली. लिजेंड्स इंडियाची धावसंख्या 109 असताना मोहम्मद कैफ तंबूत परतला. 

लिजेंड्स इंडियाची धावसंख्या 140 असताना सचिन बाद झाला. सचिन बेस्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र त्यानंतर युसूफ पठान आणि युवराज सिंगने धडाकेबाज फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. पठानने 20 चेंडूत 37 धावांची खेळी केली. टिनो बेस्टने दोन तर रेयान ऑस्टिनने एक विकेट घेतली. 

युवराजचे 7 चेंडूत 5 षटकार

लिजेंड्स इंडियाकडून खेळताना युवराजने शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये पाच षटकार लगावले. सिंक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराजने तशीच कामगिरी केली. युवराजने महेंद्र नागामुट्टूच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार लगावले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर पुन्हा एक षटकार लगावला. त्यानंतर सुलेमान बेनच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दोन षटकार लगावले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडूPrakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगेLaxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Amit Thackeray: मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Embed widget