(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sara Tendulkar : डीपफेक फोटोवरुन सचिनची लेक संतापली, पोस्ट करत म्हणाली...
Sara Tendulkar on Deepfake : सोशल मीडिया... जिथे एखाद्याच्या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पडतो तर कुणाला ट्रोलर्सची टोळी अक्षरश: घेरते... त्यात आता डीपफेकची नवी डोकेदुखी वाढलीये.
Sara Tendulkar on Deepfake : सोशल मीडिया... जिथे एखाद्याच्या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पडतो तर कुणाला ट्रोलर्सची टोळी अक्षरश: घेरते... त्यात आता डीपफेकची नवी डोकेदुखी वाढलीये. काही दिवसांआधी अभिनेत्री रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता.. ते प्रकरण मिटत नाही तोवर सचिन तेंडुलकरची लेक सारा हिचा डीपफेक फोटो व्हायरल झाला.. यावर साराने पहिल्यांदाच भाष्य केलंय. एक पोस्ट शेअर करत तिने आपला संताप व्यक्त केलाय. पाहूया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सारासाठी कसा डोकेदुखी ठरलाय?
डीपफेक फोटोवरुन सचिन तेंडुलकरची लेक संतापली. सारा आणि शुभमनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, आणि चर्चांना उधाण आलं. कुणी दोघांचं अफेअर असल्याची चर्चा केली तर कुणी सचिन तेंडुलकरचा जावई असं म्हणत दोघांनाही ट्रोल केलं. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा ट्रोलर्सचं तोंड बंद झालं. खऱ्या फोटोमध्ये सारासोबत तिचा भाऊ अर्जुन आहे. 24 सप्टेंबर रोजी साराने अर्जुनच्या वाढदिवशी हा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने अर्जुनला शुभेच्छा दिल्या होत्या. साराने पोस्ट केलेला फोटो बदलून अर्जुनच्या जागी शुभमनचा चेहरा वाररण्यात आला. अशाप्रकारे फोटो पोस्ट करणाऱ्यांना सारा तेंडुलकरने चांगलंच सुनावलं आहे.
सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांचा आनंद, दु:ख आणि दैनंदिन घडामोडींबद्दल व्यक्त होण्याचा चांगला प्लॅटफॉर्म आहे. पण टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापराने सत्य आणि खरेपणा दूर जातोय, हे काळजीत टाकणारं आहे. माझ्या व्हायरल झालेल्या डीपफेक फोटोंबाबत मला कळलं. माझ्या नावाने एक्सवर सुरु असलेलं अकाऊंट हे पॅरेडी अकाऊंट आहे. त्यांनी स्वत: त्यांच्या बायोमध्ये तसं म्हटलं आहे. पण लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते पोस्ट क्रिएट करतात. माझं एक्सवर कोणतंही अकाऊंट नाही. एक्स अशा अकाऊंटविरुद्ध कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे. मनोरंजनासाठी सत्याला किंमत मोजावी लागू नये. विश्वास आणि खरेपणाच्या संवादाला प्रोत्साहन देऊया.
साराच्या नावाने फेक अकाऊंट चालवणाऱ्यांनी फक्त साराच्या नावाने अकाऊंट सुरु केलंच. सोबतच त्या अकाऊंटला ब्लू टीकही मिळवलीये. जी बाब अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे केंद्र सरकारनेही याची दखल घेतलीये. डीपफेक फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांसंदर्भात केंद्राने कठोर पावलं उचललीत. ३६ तासाच्या आत डीपफेक फोटो किंवा व्हिडीओ न हटवल्यास परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा केंद्राने दिलाय. असे व्हिडीओ न हटवल्यास संबंधित व्यक्ती न्यायालयात धाव घेऊ शकते. एवढंच नाही तर असे व्हिडीओ आढळल्यास ऑनलाईन प्लॅटफॉर्मही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात.
यापूर्वी साऊथची अभिनेत्री रश्मिकाचाही असा फेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. काजोलही डीपफेक व्हिडीओची शिकार बनली होती. त्यानंतर आता सारा तेंडुलकरलाही
याच डीपफेकच्या कटकटीचा सामना करावा लागतोय. आपलं मत व्यक्त करण्याचं प्लॅटफॉर्म म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जातं. ही झाली नाण्याची एक बाजू तर दुसरी बाजू म्हणजे मनोरंजन पण या मनोरंजनाच्या नादात एखाद्याचं व्यक्तीमत्त्व व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेवर ओरखडा ओढला जाणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे नाही का?