South Africa vs India 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना सेंट जॉर्ज पार्क गेबेहारा येथे खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध करून दाखवलं, प्रथम खेळताना भारतीय संघाने 20 षटकात 6 विकेट गमावत 124 धावा केल्या आणि यजमान दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 125 धावांचे लक्ष्य दिले.


संजू सॅमसन शून्यावर बाद


नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. अभिषेक शर्मा 5 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. संजू सॅमसन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, मात्र त्याने पण नाराज केले. सूर्यकुमार 9 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. तिलक वर्माने 20 चेंडूत 20 धावा केल्या. अक्षर पटेलने 21 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले.






हार्दिक पांड्याची महत्त्वपूर्ण खेळी


भारताकडून अष्टपैलू हार्दिक पांड्याने 45 चेंडूत सर्वाधिक 39 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. रिंकू सिंग 11 चेंडूत 9 धावा करून आऊट झाला. ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. हार्दिक पांड्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. त्यामुळे भारतीय संघ 124 धावांपर्यंत मजल मारू शकला.


दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, अँडी सिमेलॉन, एडन मार्कराम आणि एन. पीटरने प्रत्येकी 1 बळी घेतला. मार्को यानसेनने 4 षटकांत 25 धावांत 1 खेळाडू बाद केला. तर जेराल्ड कोएत्झीने 5 षटकात 25 धावा देत 1 बळी मिळवला.


भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. अशाप्रकारे भारतीय संघ 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.


हे ही वाचा -


SA vs IND 2nd T20 : हाय रे फूटी किस्मत! संजू 'शून्यावर' क्लीन बोल्ड... नावावर 'हा' लज्जास्पद विक्रम, वाचून तुम्हीही थक्क व्हाल


Rohit Sharma Ind vs Aus Test : मोठी अपडेट! भारतीय कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर? कोच गौतम गंभीर घेणार पत्रकार परिषद