South Africa vs India 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात असून या सामन्यात आफ्रिकन संघाचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या सामन्यात 50 चेंडूत 107 धावांची खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात आपले खातेही उघडता आले नाही. केवळ 3 चेंडूंचा सामना केल्यानंतर सॅमसन खाते न उघडता मार्को जॅन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यासह संजू सॅमसनने भारतीय फलंदाज म्हणून एक नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला.
दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा सलामीवीर संजू सॅमसन पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद झाला. यासह त्याच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला. संजू सॅमसनने आता शून्यावर आऊट होऊन 15 वर्षे जुना विक्रम आपल्या नावावर केला आहे. एका वर्षात टी-20 मध्ये सर्वाधिक वेळा 0 धावांवर बाद होणारा तो भारताचा खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता, जो 2009 साली टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते न उघडता तीन वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला होता. सॅमसनला या सामन्यात खातेही उघडण्यात यश आले नाही, तर शेवटच्या 2 डावात त्याने आपल्या बॅटने शतके झळकावली होती, त्यामुळे संघासाठी ही फारशी चिंतेची बाब नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, संजू हा भारतीय क्रिकेटमधला पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने सलग 2 T20 आंतरराष्ट्रीय डावात शतके झळकावली आहेत.
एका वर्षात सर्वाधिक T20I मध्ये भारतासाठी 0 धावांवर बाद झालेले खेळाडू
4 - संजू सॅमसन (2024)
3 - युसूफ पठाण (2009)
3 - रोहित शर्मा (2018)
3 - रोहित शर्मा (2022)
3 - विराट कोहली (2024)
सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्माही ठरले फ्लॉप
या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण अवघ्या 5 धावांच्या स्कोअरवर भारताची दुसरी विकेट गेली. सलामीवीर अभिषेक शर्मा 5 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवलाही पहिल्या सामन्याप्रमाणे काही विशेष करता आले नाही आणि तोही 9 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. सूर्या बाद होताच भारताने 15 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या.
हे ही वाचा -