Yashvardhan Dalal CK Nayudu Trophy : क्रिकेटमध्ये दररोज अनेक विक्रम बनतात तर अनेक तुटतात. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाहिला मिळते. असाच पराक्रम हरियाणा आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात घडला. जेथे 23 वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीमध्ये हरियाणाकडून खेळताना यशवर्धन दलालने अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्याने अशी कामगिरी केली आहे, जी आजपर्यंत संपूर्ण स्पर्धेत कोणीही करू शकले नाही. यशवर्धनने मुंबईविरुद्ध 428 धावा करत इतिहास रचला आहे. 1973-74 हंगामापासून खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या इतिहासात 400 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज आहे.


समीर रिझवीचा मोडला विक्रम


हरियाणाकडून सलामीला आलेल्या यशवर्धन दलालने उत्कृष्ट खेळी केली. त्याने 465 चेंडू खेळून 428 धावा केल्या, यादरम्यान, त्याने 46 चौकार आणि 12 षटकार ठोकले. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या समीर रिझवीचा विक्रम यशवर्धनने मोडला आहे. गेल्या मोसमात उत्तर प्रदेशकडून खेळताना रिझवीने सौराष्ट्रविरुद्ध अवघ्या 266 चेंडूत 312 धावा केल्या होत्या, ही या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या होती, आता यशवर्धन त्याच्या पुढे गेला आहे.


या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. या सामन्यात हरियाणाच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. यशवर्धन दलाल आणि अर्श रंगा या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 410 धावा केल्या. अर्श रंगाने 151 धावांची खेळी खेळली आणि यादरम्यान त्याने 18 चौकार आणि एक षटकार लगावला. या फलंदाजांसमोर मुंबईचे गोलंदाज फ्लॉप ठरले. मात्र मुंबईचा गोलंदाज अथर्व भोसलेच्या चेंडूवर अर्श बाद झाला.






अर्श रंगा बाद झाल्यानंतरही यशवर्धनने दुसऱ्या टोकाकडून स्फोटक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याच्यामुळेच संघाने दुसऱ्या दिवशी आठ गडी बाद 742 धावा करून डाव घोषित केला. मुंबईसाठी अथर्व भोसलेने 58 षटकांत 129 धावांत 5 बळी घेतले. त्याच्याशिवाय इतर गोलंदाजांना फारसे यश दाखवता आले नाही.


हे ही वाचा -


ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीवरून भारत-पाकिस्तान वाद पेटला! ICC ने रद्द केले सर्व कार्यक्रम, समोर आले मोठे कारण


AUS vs PAK : पाकिस्तानने उतरला कांगारूंचा माज! 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात जिंकली वनडे मालिका, रचला इतिहास