South Africa vs India 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज 10 नोव्हेंबर रोजी गेकेबरहा येथे खेळवला जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने संघात एक बदल केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात क्रुगरच्या जागी रीझा हेंड्रिक्सला संधी देण्यात आली आहे.
या मालिकेत भारतीय संघ आधीच 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने पहिला सामना 61 धावांनी जिंकला होता. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने दमदार कामगिरी करत शतक झळकावले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी चांगली कामगिरी केली होती. आता दुसरा सामना जिंकून टीम इंडियाचे डोळे मालिका जिंकण्यावर असतील. त्याचबरोबर हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिका मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
गकेबरहा येथे झाले चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने
आत्तापर्यंत, फक्त 4 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यात पहिला सामना 2007 साली दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला होता, ज्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने 5 विकेट्सने सामना जिंकला होता. गाकेबरहा येथे आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे, तर दोनदा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), रायन रिक्लेटन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.
हे ही वाचा -