India vs Australia Test Series : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी रविवारी आणि सोमवारी भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. मात्र, भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघासह ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार शकणार नाही.
रोहित शर्मा टीमसोबत ऑस्ट्रेलियाला का नाही जाणार?
मात्र, रोहित शर्माची भविष्यातील योजना काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचवेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषद घेणार आहेत. भारतीय संघाचे खेळाडू रविवारी आणि सोमवारी 2 बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. अलीकडेच बातमी आली होती की, रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप होणार आहे. या कारणास्तव त्याने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कसोटी फॉरमॅटमध्ये रोहित शर्माचे भविष्य?
अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर आपल्याच भूमीवर कसोटी मालिका गमावली. त्याचबरोबर या पराभवानंतर रोहित शर्माच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये रोहित शर्माचे भवितव्य काय असेल? रोहित शर्मा कर्णधारपदी किती दिवस राहणार? या प्रश्नांची उत्तरे येणे बाकी आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर रोहित शर्माच्या भवितव्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. याशिवाय गौतम गंभीरला कसोटी फॉर्मेटमध्ये मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या सर्व सामन्यांची वेळ (भारतीय वेळेनुसार)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी – सकाळी 7:50 वाजता (पर्थ येथे 22 ते 26 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी- सकाळी 9:30 वाजता (ॲडलेड 06 ते 10 डिसेंबर)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी – सकाळी 5:50 वाजता (ब्रिस्बेन 14 ते 18 डिसेंबर)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी – सकाळी 5 वाजता (मेलबर्न 26 ते 30 डिसेंबर)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी – सकाळी 5 वाजता (सिडनी 03 ते 07 जानेवारी)
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.