एक्स्प्लोर

IND A Vs SA A 1st ODI : ऋतुराज गायकवाडचं शतक, नीतीश रेड्डीचा ‘किलर फिनिश’; टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी

ऋतुराज गायकवाडने ठोकले शतक अन् दक्षिण आफ्रिकेला बसला धक्का! टीम इंडियाने शेवटच्या षटकात सामना जिंकला...

IND vs SA 1st Unofficial ODI Highlights : राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या अनऑफिशियल वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंडिया-अ संघाने दक्षिण आफ्रिका-अ संघावर 4 विकेटने थरारक विजय मिळवला. 286 धावांचे कठीण आव्हान टीमने शेवटच्या षटकात पार करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

टीम इंडियाने शेवटच्या षटकात सामना जिंकला

इंडिया-अ संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे ऋतुराज गायकवाड. उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत त्याने 129 चेंडूत 117 धावांची दणदणीत खेळी साकारली. या खेळीत त्याने 12 चौकारांची आतषबाजी केली.  सलामीवीर अभिषेक शर्माने 31 धावांची चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार तिलक वर्माने 39 धावा करून डावाला मजबुती दिली. अखेरच्या टप्प्यात नीतीश रेड्डीने फिनिशरची धमाकेदार भूमिका बजावत 26 चेंडूत 37 धावा ठोकल्या. त्याने एक षटकार आणि तीन चौकार लगावून सामना इंडिया-अ संघाच्या बाजूला खेचला. शेवटी निशांत सिंधूने 29 धावांवर नाबाद राहून संघाला विजय मिळून दिला. दक्षिण आफ्रिका-एकडून ब्योर्न फोर्टुइन, ओटनील बार्टमॅन आणि तियान वॅन व्युरेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

दक्षिण आफ्रिका-अ संघाची खराब सुरुवात; पण.... 

यापूर्वी नाणेफेक हरून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका-एची अवस्था 53 धावांत 5 गडी बाद अशी झाली होती. स्कोर 150 च्याही पुढे जाईल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण त्यानंतर डेलानो पोटगीटर, डायन फॉरेस्टर आणि ब्योर्न फोर्टुइन यांनी सामन्याला वेगळ्याच वळणावर नेले. पोटगीटरने 105 चेंडूत 90 धावांची जबरदस्त खेळी केली. त्यात 10 चौकार आणि एक षटकार होता. त्याने फॉरेस्टरसोबत सहाव्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. फॉरेस्टरनेही 77 धावा करून साथ दिली. अखेरीस फोर्टुइनने 58 धावा झळकावत टीमला 285 धावांपर्यंत नेले. इंडिया-एकडून हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांनी दोन-दोन विकेट घेतल्या.

दुसरा सामना 16 नोव्हेंबरला

मालिकेतील दुसरा सामना देखील राजकोटमध्येच 16 नोव्हेंबरला रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका-अ पुनरागमनासाठी उतरेल, तर इंडिया-अ मालिकाच जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे.

टीम इंडिया अ संघाची प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, तिलक वर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, निशांत सिंधू, हर्षित राणा, विपराज निगम, अर्शदीप सिंग, प्रसीद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका अ संघाची प्लेइंग इलेव्हन

रिवाल्डो मूनसामी, रुबिन हर्मन (यष्टीरक्षक), जॉर्डन हर्मन, मार्कस अकरमन (कर्णधार), सिनेथेम्बा केशिले, डायन फॉरेस्टर, डेलानो पॉटगीटर, ब्योर्न फोर्टुइन, टियान व्हॅन वुरेन, त्शेपो मोरेकी, ओथनील बार्टमन.

हे ही वाचा -

IND vs SA 1st Test Toss Update : 4 फिरकीपटू, 2 गोलंदाज; कर्णधार शुभमन गिलचा मोठा निर्णय, टीम इंडियात दोन मोठे बदल, जाणून घ्या Playing XI

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Who is Prince Yadav Ind vs Afg 2nd ODI : वय लपवलं म्हणून लागला कलंक, पण कोहलीची विकेट घेतली अन् नशीबच बदललं... फ्लॉप टीमचा 'हा' हिरो कसा बनला भारताचा डेब्यू स्टार?
वय लपवलं म्हणून लागला कलंक, पण कोहलीची विकेट घेतली अन् नशीबच बदललं... फ्लॉप टीमचा 'हा' हिरो कसा बनला भारताचा डेब्यू स्टार?
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
T20 Mumbai League : मुंबई क्रिकेटचा स्टार, चिन्मय सुतार; बॅक-टू-बॅक विजेतेपदात बजावली मोलाची भूमिका
मुंबई क्रिकेटचा स्टार, चिन्मय सुतार; बॅक-टू-बॅक विजेतेपदात बजावली मोलाची भूमिका

व्हिडीओ

Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OmRaje Nimbalkar: 'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहाजींना चिट्टी पाठवली आहे... ' थेट मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहाजींना चिट्टी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
Sushma Andhare :
"ओमराजेंनी फोन उचलला नाही, कैलास पाटील म्हणाले मी स्वतःची गॅरंटी देतो पण..."; सुषमा अंधारेंचा पुण्यात खळबळजनक खुलासा, विमानात कोण होतं त्यांची नावं...
Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
Pranit More 370 Biryani: 'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!
ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!
Prakash Waje Shivsena : विकासनिधी शब्द वापरून राजाभाऊंना मोठा ऑफर; दीड वर्षांपूर्वी ठाण्यातही बोलावलं अन्....; वडील प्रकाश वाजेंनी सगळंच सांगितलं!
विकासनिधी शब्द वापरून राजाभाऊंना मोठा ऑफर; दीड वर्षांपूर्वी ठाण्यातही बोलावलं अन्....; वडील प्रकाश वाजेंनी सगळंच सांगितलं!
Embed widget