अय्यर, अक्षरची दुखापत भारताची चिंता वाढवणार? काय म्हणाला रोहित शर्मा
World Cup 2023 : विश्वचषक अवघ्या काही दिवसावर आला आहे. पण भारताचे दोन महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त आहे.

World Cup 2023 : विश्वचषक अवघ्या काही दिवसावर आला आहे. पण भारताचे दोन महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढल आहे. पाच ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे. भारताला तयारीसाठी ही अखेरची संधी असेल. आशिया चषकात अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला होता. त्याशिवाय श्रेयस अय्यर याची दुखापतही बळावली होती. त्यामुळे अय्यरला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. तर अक्षर पटेल फायनलला मुकला होता. पण या दोघांच्या दुखापतीने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. कर्णधार रोहित शर्मा याने याबाबत वक्तव्य केलेय. आशिया चषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा पत्रकार परिषेद बोलत होता. रोहित शर्मा म्हणलाा की, श्रेयस ठीक आहे. पण त्याला आणखी थोडा वेळ लागेल. तर अक्षर 7 ते 10 दिवसांत बरा होऊ शकतो.
क्रिकबजच्या एका रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यर याच्याबद्दल रोहित म्हणाला, "श्रेयसच्या फिटनेसबाबत मला माहीत आहे. अंतिम सामन्यात तो खेळू शकला नाही. काही पॅरामीटर्समुळे तो बाहेर राहिला. पण आता त्यांनी सर्व मानके पूर्ण केली आहेत. तो 99 टक्के ठीक आहे. त्याने चांगली फलंदाजी केली आणि तासंतास क्षेत्ररक्षणही केले. श्रेयसने मैदानावर मेहनत घेतली आहे. त्यामुळे तो सध्या बरा दिसत आहे.
अक्षर पटेलच्या दुखापतीबाबतही कर्णधार रोहित शर्मा याने माहिती दिली. रोहित शर्मा म्हणाला की, अक्षर पटेलबद्दल मला खात्री नाही. त्याला किरकोळ दुखापत झाली असे वाटतेय. आठवडाभरात किंवा दहा दिवसांत अक्षर पटेल बरा होईल, असे वाटतेय. आता तो दुखापतीतून कसा सावरतो हे पाहायचे आहे, कारण प्रत्येक खेळाडूची परिस्थिती वेगळी असते. काही खेळाडू लवकर बरे होतात. मला वाटतं अक्षरची हीच गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणे त्याच्यासाठी योग्य ठरेल की नाही याची मला पूर्ण खात्री नाही.
अक्षर पटेल भारतासाठी अखेरचा सामना आशिया चषकात सुपर ४ मध्ये बांगलादेशविरोधात खेळला होता. दुखापतीमुळे अक्षर पटेल याला आशिया चषकातून माघार घ्यावी लागली. टीम इंडियाने तात्काल वॉशिंगटन संदुर याला पाचारण केले होते. वॉशिंगटन सुंदर याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले होते. श्रेयस अय्यर याने पाकिस्तानविरोधात अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेरच आहे. आज अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्या दुखापतीबाबत माहिती मिळेल. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांची पत्रकार परिषद आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी संघनिवडीबाबत माहिती दिली जाणार आहे. यावेळी दुखापतीबाबतही माहिती दिली जाईल.




















