एक्स्प्लोर

पहिले शिवी, मग सॅल्यूट; रोहित शर्माचा व्हिडीओ एकदा बघाच, तुम्हालाही हसू आवरणार नाही!

Rohit Sharma: एका कार्यक्रमदरम्यानचा रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Rohit Sharma: एका पुरस्कार सोहळ्यासाठी भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील उपस्थित होता. या कार्यक्रमदरम्यानचा रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानाच्या आत असो की बाहेर, त्याची मजेशीर शैली नेहमीच पाहायला मिळते. कधी त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड होतो, तर कधी त्याच्या काही मजेदार कृती कॅमेऱ्यात कैद होतात. यावेळीही असेच काहीसे घडले. रोहित शर्माचे एक मजेदार कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

नेमकं व्हिडीओमध्ये काय?

रोहित शर्मा या व्हिडिओमध्ये एका खुर्चीवर बसलेला आहे. रोहित शर्मा सुरुवातीला आपल्या शर्टाची कॉलर ठीक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित आपली कॉलर थोडी फोल्ड करत आहे. हे करताना रोहित थोडासा वैतागलेला दिसत आहे. कारण ही गोष्ट त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर रोहित शर्मा काहीतरी अपशब्द बोलतो आणि त्याचवेळी तो मागे वळून बघतो, तर कोणीतरी त्याचा व्हिडीओ काढत असतो. त्यामुळे मोबईल पाहताच रोहित शर्मा त्याला सॅल्यूट करतो. 

तीन जणांना दिले विश्वचषक विजयाचे श्रेय-

रोहित शर्माने या कार्यक्रमात टी- 20 विश्वचषकाच्या विजयावरही भाष्य केलं. भारतीय कर्णधार रोहित शर्माने विजयाचे श्रेय देताना तीन खास नावे घेतली. हिटमॅनने सांगितले की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी मिळविण्याच्या त्याच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा दिला होता.

रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 

रोहित शर्माला सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये पुरूषांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब देण्यात आला. रोहित शर्माला त्याची उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट कर्णधार म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. 

श्रेयस अय्यरचाही व्हिडीओ आला समोर-

या कार्यक्रमादरम्यानचा रोहित आणि श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. तर झाले असे की, या पुरस्कार सोहळ्यासाठी रोहित शर्मा थोड्या उशिराने पोहोचला, श्रेयस अय्यर तिथे आधीच उपस्थित होता. रोहित दिसताच श्रेयसने जागेवरून उठून त्याला स्वतःची खुर्ची देऊ केली. मात्र, मोठ्या मनाच्या रोहितने त्याला समोरची खुर्ची देत स्वतः मागे बसला. यानिमित्ताने भारतीय कर्णधाराचा संघ सहकाऱ्यांना किती आदर आहे, याची प्रचिती आली.

संबंधित व्हिडीओ-

वडील भारताकडून क्रिकेट खेळले, आता मुलगा इंग्लंडच्या संघात; कोण आहे हॅरी सिंग?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 07 November 2024Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Embed widget