Ind vs Aus 3rd Test : कॅप्टनने केली कॅप्टनची शिकार... रोहित शर्मा नापास, टीम इंडियावर फॉलोऑनचा धोका, करावे लागणार 'हे' काम
Ind vs Aus 3rd Test Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला.
Rohit Sharma Flopped Again Brisbane Test : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो काही विशेष करू शकला नाही. चौथ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या अर्ध्या तासात त्याने विकेट गमावली. त्यामुळे टीम इंडिया खूप दडपणाखाली आली असून त्यांच्यावर फॉलोऑनचा धोका निर्माण झाला आहे. रोहित शर्माने 27 चेंडूंचा सामना करत 2 चौकारांच्या मदतीने केवळ 10 धावा केल्या.
Pat Cummins is that fired up after getting Rohit Sharma!#AUSvIND | #OhWhatAFeeling | @Toyota_Aus pic.twitter.com/dZImJlva2I
— cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2024
कॅप्टनने केली कॅप्टनची शिकार... रोहित शर्मा पुन्हा फेल
भारतीय संघ कालच्या धावसंख्येच्या पुढे खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळात दोन्ही भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. ब्रिस्बेनमध्ये आज हवामान पूर्णपणे स्वच्छ होते आणि फलंदाजांसाठी परिस्थिती अनुकूल होती. त्यामुळे रोहित आणि केएल राहुल यांच्यात 30 धावांची चांगली भागीदारी झाली. हे दोन फलंदाज टीम इंडियाला संकटातून बाहेर काढतील आणि मोठी भागीदारी रचली जाऊ शकते, असे वाटत असतानाच रोहित शर्माने आपली विकेट गमावली. कर्णधार पॅट कॉमिंटच्या चेंडूवर तो विकेटच्या मागे झेलबाद झाला. म्हणजेच कॅप्टनने कॅप्टनची शिकार केली.
FIFTY!
— BCCI (@BCCI) December 17, 2024
A gritty half-century by @klrahul 🙌🙌
His 17th in Test cricket.
Live - https://t.co/dcdiT9NAoa… #AUSvIND pic.twitter.com/4Ky88D9ZeL
केएल राहुलची शानदार अर्धशतकी खेळी
आता फॉलोऑन कसा वाचवायचा हा भारतीय संघासमोर मोठा प्रश्न आहे. कारण अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला असून फॉलोऑन वाचवण्यासाठी टीम इंडियाला अजूनही 150 हून अधिक धावांची गरज आहे. तथापि, केएल राहुलने निश्चितपणे भारतासाठी शानदार फलंदाजी केली आणि शानदार अर्धशतक झळकावले. तो एका टोकावरून चांगली कामगिरी करत आहे. पण दुसऱ्या टोकाला त्याला कोणत्याही भारतीय फलंदाजाची साथ मिळत नव्हती.
यापूर्वी भारताची टॉप ऑर्डर फेल ठरली. विराट कोहली, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत हे दिग्गज फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत. अशा स्थितीत टीम इंडियावर आणखी एका सामन्यात पराभवाचा धोका निर्माण झाला आहे. जर टीम इंडियाने हा सामना गमावला तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -