एक्स्प्लोर

IND VS AFG 2nd ODI : ज्यावेळी वाटत होतं आज रोहित इतिहास रचणार, त्याच क्षणी घात झाला! राशिदच्या त्या गुगलीने हिटमॅनला कसं फसवंलं? पाहा Video

Rohit Sharma IND VS AFG 2nd ODI : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होता.

Rohit Sharma Bowled By Rashid Khan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (IND VS AFG 2nd ODI) मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, एका मोठ्या खेळीपासून तो मुकला. जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या रोहितला अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खानने आपल्या एका जादूई चेंडूवर क्लीन बोल्ड करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या विकेटसह राशिद खानने पुन्हा एकदा सिद्ध केले की, रोहितविरुद्ध त्याचे पारडे नेहमीच जड राहिले आहे.

रोहित शर्मा झाला बोल्ड, नेमकं काय घडलं?

हा थरार भारतीय डावाच्या 13.1 षटकात पाहायला मिळाला, जेव्हा राशिद खान गोलंदाजीसाठी आला. राशिदने 92.7 किलोमीटर प्रति तास वेगाची एक अचूक गुगली टाकली, जी समजून घेण्यात रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला. चेंडू पिचवर टप्पा पडल्यानंतर वेगाने आतल्या बाजूला वळाला. बॅकफूटवर असलेल्या रोहितला सावरण्याची संधीच मिळाली नाही. त्याने घाईघाईत आपली बॅट खाली आणण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत चेंडू बॅटची आतली कडा घेत थेट स्टंप्सवर जाऊन धडकला.

बाद होण्यापूर्वी रोहित शर्माने मैदानाच्या चारी बाजूंना काही चांगले फटके मारले होते. मात्र, अवघ्या 2 धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. रोहितने 39 चेंडूंचा सामना करताना 48 धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये 6 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. रोहित जोपर्यंत क्रीझवर होता, तोपर्यंत तो आज मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते, पण राशिद खानने योग्य वेळी विकेट घेत भारताला मोठा धक्का दिला.

रोहित विरुद्ध राशिद, आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीवर नजर टाकली तर रोहित शर्माविरुद्ध राशिद खानचा दबदबा नेहमीच राहिला आहे. आतापर्यंत हे दोघे 11 डावांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत, ज्यात रोहितने रशीदच्या 75 चेंडूंवर102 धावा केल्या आहेत, परंतु याच काळात रशीदने त्याला सहा वेळा बाद केले आहे. रशीदविरुद्ध रोहितची फलंदाजीची सरासरी केवळ 17 आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, राशिद खानच्या फिरकीसमोर रोहित शर्मा अनेकदा अडचणीत सापडला आहे आणि या सामन्यातही राशिदने तीच परंपरा कायम ठेवली.

हे ही वाचा - 

Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : पहिले थर्ड अंपायर धावला, मग फिल्डरने जीवदान दिलं; पण वैभव सूर्यवंशीने शेवटी माती खाल्ली?, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं
बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं
IND vs SL 1st Test DAY-2 Live : टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! गॉलमध्ये पाऊस, मैदान झाकलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! गॉलमध्ये पाऊस, मैदान झाकलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
Rohit Sharma : रोहित शर्माला संघातून बाहेर काढणार होते, पण...; BCCIमध्येच उभी फूट, सिलेक्टर्स अन् बोर्ड आमनेसामने; पडद्यामागे काय घडतंय?
रोहित शर्माला संघातून बाहेर काढणार होते, पण...; BCCIमध्येच उभी फूट, सिलेक्टर्स अन् बोर्ड आमनेसामने; पडद्यामागे काय घडतंय?
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Embed widget