Rohit Sharma : रोहित शर्माकडून धोकादायक मिलरचा दाखला देत सूर्यावर कौतुकाचा वर्षाव अन् वानखेडेवर टाळ्यांचा कडकाट
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघ ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत दाखल होताच लाखो चाहत्यांनी त्यांचं स्वागत केलं. यानंतर रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवच्या कॅचचं कौतुक केलं.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Team India ) ट्वेन्टी-20 विश्वचषकासह गुरुवारी मायदेशी पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतल्यानंतर सूंपूर्ण टीम मुंबईत पोहोचली. रोहित शर्मासह (Rohit Sharma) संपूर्ण संघ नरिमन ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी परेड मध्ये सहभागी झाला. यानंतर वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सोहळ्यात विश्वविजेत्या संघाचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहित शर्मा यानं भाषणात सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं कौतुक केलं. सूर्यकुमार यादवचं रोहित शर्मानं कौतुक करताच वानखेडेवर टाळ्यांचा कडकडाट झाला.
रोहित शर्मा सूर्यकुमार यादवच्या कॅचबद्दल काय म्हणाला?
हार्दिक पांड्या शेवटची ओव्हर टाकत असताना मी लाँग ऑनला उभा होतो तर सूर्यकुमार यादव लाँग ऑफला उभा होता, असं रोहित म्हणाला. यावेळी त्यानं हार्दिकचं कौतुक देखील केलं. त्या ओव्हरपूर्वी टेक्निकल गोष्टींवर चर्चा केली होती. मैदानावर वारं देखील वाहत होतं. डेव्हिड मिलर हा धोकादायक खेळाडू मैदानावर होता, त्याच्यापासून बॉल दूर ठेवायचं ठरवलेलं. हार्दिकनं तो बॉल टाकला, डेव्हिड मिलरनं हवेत मारला, मला वाटलं बॉल गेला पण तो परत आला. त्यासोबत सर्वच गोष्टी परत आल्या. बॉल ग्राऊंडच्या बाहेर गेला नाही, सूर्यानं अप्रतिम कॅच घेतला त्याबद्दल त्याचं कौतुक आहेच. सूर्यानं सराव सत्रात त्याचं प्रॅक्टिस केलं होतं.
आम्हाला माहिती आहे दबाव असतो त्यावेळी असे कॅच घेणं महत्त्वाचं असतं. सूर्यानं त्याचा सराव केला होता,त्यानं मिलरचा कॅच घेतला, असं सांगताच वानखेडेवर सूर्यकुमार यादवसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला. रोहित शर्मानं या टीमचा अभिमान वाटतो. मला अशी टीम मिळाली याबद्दल नशीबवान आहे, असं रोहित शर्मानं म्हटलं.
रोहित शर्मानं वानखेडे स्टेडियमवर जमलेलेल्या आणि बाहेर मरीन ड्राईव्हवर असलेल्या चाहत्यांना अभिवादन केलं. आम्हाला जसा विश्वचषक जिंकायचा होता, त्यापेक्षा जास्त लोकांची इच्छा होती, असं वाटतं असल्याचं रोहित शर्मा म्हणाला. आम्ही 29 जूनला जे करुन दाखवलं त्यानं कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, याचा अभिमान आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्माला 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतरची भावना आणि आताची स्थिती नेमकं काय वाटतं असं विचारण्यात आल्यानंतर त्यानं 2007 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत झालेलं स्वागत विशेष होतं. आता देखील 17 वर्षानंतर विजय मिळवणं देखील खूप खूप विशेष असल्याचं रोहित शर्मानं म्हटलं. मुंबईकर चाहत्यांनी टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं.
संबंधित बातम्या :
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया