IND Vs SL Test series: रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराला वगळलं
IND Vs SL Test series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
![IND Vs SL Test series: रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराला वगळलं Rohit Sharma appointed Test captain for the upcoming Sri Lanka series; Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara dropped from the Test series against Sri Lanka IND Vs SL Test series: रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराला वगळलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/06df5c278127a99f135b4338c00348d3_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND Vs SL Test series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी कसोटी मालिकेतून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) वगळण्यात आलंय. तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाची कमान संभाळणार आहे. तर जसप्रीत बुमराहकडं (Jasprit Bumrah) टी-20 संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आलीय. भारताचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी याबाबत माहिती दिलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
रविंद्र जाडेजाचं संघात पुनारागमन
विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना श्रीलंकाविरोधातील टी 20 मालिकेत विश्रांती देण्यात आलीय. याशिवाय, अष्टपैलू शार्दुल ठाकूरला टी-20 आणि कसोटी मालिकेतून आराम देण्यात आलाय. तर, रविंद्र जाडेजाचं दुखापतीनंतर संघात पुनरागमन झाले आहे.
व्हिडिओ-
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचं वेळापत्रक
बीसीसीआयने मंगळवार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर, पुढचे दोन सामने धर्मशाळा येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील. जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल. तर, दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार),मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार
हे देखील वाचा-
- IND Vs WI, 3rd T20: तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडचं कमबॅक? विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळण्याची शक्यता
- Virat Kohli : वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या टी20 मध्ये विराट दिसला धमाकेदार फॉर्ममध्ये, सांगितलं 'या' खेळीमागचं कारण
- IND vs WI, 2nd T20: रोमहर्षक सामन्यात भारत 8 धावांनी विजयी, मालिकेतही विजयी आघाडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)